शिवप्रहार न्युज - मनसे उमेदवार राजाभाऊ कापसेंचा झंझावात ! धडाकेबाज प्रचार शुभारंभ!!
मनसे उमेदवार राजाभाऊ कापसेंचा झंझावात ! धडाकेबाज प्रचार शुभारंभ!!
श्रीरामपूर ( शिवपरहारन्यूज ) मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी झंझावात करत प्रचार नारळ फोडला! आज मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मनसे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, मनसे तालुकाध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज श्रीरामपूर रेल्वे स्टेशन येथील श्री हनुमान मंदिर येथे महाआरती करून प्रचाराचे शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी राजाभाऊ कापसे म्हणाले की,मी वयाच्या १४ वर्षापासून दलित पॅंथर माध्यमातून व त्यानंतर केंन्द्रीय मंत्री रामदास आठवले,अध्यक्ष आर.पी.आय. यांच्यासोबत आतापर्यंत काम करत होतो व त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहा वर्षापासून महायुती बरोबर काम करत होतो.परंतु लोकसभा व विधानसभेला आरपीआय पक्षाला महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये एकही जागा न दिल्याने बुद्ध समाजाचा महायुती व महाविकास आघाडी या चारी पक्षांनी अपमान केला असे जाणवल्याने मी मनसे पक्षात प्रवेश केला.त्याचे कारण असे की श्रीरामपूर विधानसभेमध्ये 40 ते 50 हजार बौद्ध समाज आहे.म्हणूनच या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी आरक्षण पडले आहे असे असताना बहुसंख्य बौद्ध समाजाला शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी उमेदवारी दिलेली नाहीये.मी गेल्या अनेक वर्षांपासून दलित चळवळीत काम करून या गोरगरीब समाजाचे अडीअडचणी सोडवलेल्या आहे म्हणून सर्व बौद्ध समाज,मातंग समाज व इतर सर्व हिंदू मुस्लिम व सर्व समाज मला भरघोस मतांनी निवडून देतील असा विश्वास वाटत आहे.
असा विश्वास बसण्याचे कारण की,आज हजारो श्रीरामपूर येथील नागरिक प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहिले. याच्यावरून मला विश्वास वाटत आहे व श्रीरामपूर येथील जनतेने मला निवडून दिल्यास माझे पहिले कर्तव्य राहील की श्रीरामपूर जिल्हा करण्याचे,त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचे भव्य स्मारक श्रीरामपूर शहरात बनविण्यात येईल.तसेच MIDC मध्ये मोठे उद्योगधंदे आणून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात देईल श्रीरामपूर शहर व तालुक्यामध्ये दर्जेदार व टिकाऊ रस्ते बनवेल व श्रीरामपूर तालुका विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबर बनवेल असे मनसे पक्षाचे उमेदवार श्री राजाभाऊ कापसे याप्रसंगी म्हणाले.तसेच याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की मनसे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांना निवडून दिल्यास मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारातील विकास आराखडा (ब्ल्यू प्रिंट) प्रमाणे तालुक्याचा विकास करू व तसेच हिंदूंचे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे व्हावे यासाठी प्रयत्न करू व तसेच प्रत्येक हिंदूंच्या रक्षणासाठी काम करू व लव जिहाद व लँड जिहाद होऊ देणार नाही.श्रीरामपूर शहर व तालुक्यातील गुंडागर्दी संपुष्टात आणून श्रीरामपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे कामे करू,तसेच मोठमोठ्या शैक्षणिक संस्था उभारू,श्रीरामपूरच्या हितासाठी रेल्वे इंजिन समोरील बटण दाबून राजाभाऊ कापसे यांना प्रचंड मतांनी विजयी करावी अशी विनंती मतदारांना या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केली आहे.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी कापसे, राकेश कापसे, राहुल कापसे, रॉकी लोंढे,निलेश सोनवणे, विलास पाटणी,मारुती शिंदे, नितीन जाधव,भास्कर सरोदे, अतुल खरात, संकेत शेलार, शिवाजी दांडगे, सुनील करपे, बाबासाहेब वाकचौरे, नितीन खरे, बाबासाहेब काळे, राजू शिंदे संदीप विशंभर सौरभ निर्मळ दीपक शेटे सुरेश शिंदे नंदू गंगावणे, बापू लबडे, श्याम सदाफळ,विकी परदेशी, प्रशांत गमले, सुमित चौधरी, फिरोज सय्यद, चेतन दिवटे, सागर शिंदे,उज्वला दिवटे, सुवर्णा ससाने, सुजित गायकवाड, लखन इंगळे,संतोष पवार, देवेंद्र मोरे,औदुंबर खरात, आकाश शिंदे राहुल शिंदे आर्यन शिंदे नितेश शिंदे सुमित शिंदे, संजय शिंदे,ऋषिकेश खरात, सचिन खरात,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाभाऊ कापसे हे आता मनसेचे उमेदवार असल्याने व ते श्रीरामपूर मतदार संघात सर्वदूर परिचित असल्याने ते या विधानसभा निवडणुकीत कोणा कोणाला ' धक्का' देतात याची जोरदार चर्चा असून लढत चौरंगी होत असल्याचे चित्र आहे .