दाभोळकर हत्याकांडातील आरोपी तथा सनातन संस्थेचा सदस्य विक्रम भावेचा उच्च न्यायालयाकडुन जामीन मंजूर
दाभोळकर हत्याकांडातील आरोपी तथा सनातन संस्थेचा सदस्य विक्रम भावेचा उच्च न्यायालयाकडुन जामीन मंजूर...
मुंबई: अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे संस्थापक डॉ.नरेद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा सदस्य विक्रम भावे याला उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. जामीन आदेशाला स्थगिती देण्याची सीबीआयची मागणीही न्यायालयाने या वेळी फेटाळली आहे.
या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना मदत केल्याचा आरोप भावे याच्यावर आहे . मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने भावे याची एक लाख रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे आदेश देताना दररोज पोलीस स्टेशनला उपस्थिती लावण्याचे सांगितले आहे .
तसेच अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा न गुंतण्याची अटही न्यायालयाने भावेला घातली आहे. भावे हा दाभोलकर यांची हत्या जिथे करण्यात आली ती जागा निश्चित करण्यासाठी मुख्य आरोपी कळसकर, अंदुरे यांच्यासोबत गेला होता त्यानेच दोघांना हल्ल्यानंतर पळून जाण्याचा मार्गही सांगितला होता.