शिवप्रहार न्यूज-शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात संपन्न …

शिवप्रहार न्यूज-शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात संपन्न …

शिवप्रहार प्रतिष्ठानच्यावतीने क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात संपन्न …


श्रीरामपूर - “जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी” असा यल्गार देऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारणारे क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची आज 14 नोव्हेंबर रोजी जयंती असते.त्यानिमित्ताने आज बजरंगनगर,बेलापूर रोड येथील शिवप्रहार प्रतिष्ठानच्या कार्यालयात वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन,पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
          युगप्रवर्तक,युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्यात वस्ताद लहुजी साळवे यांचे पूर्वजांनी योगदान दिले आहे.छत्रपतींनी आपल्याला अठरापगड जातीच्या हिंदू समाजाला एक करण्याची शिकवण दिलेली असल्यामुळेच “शिवप्रहार प्रतिष्ठान” याच विचारधारेवर कार्य करून सर्व जातींना समान मानुन संघटित करण्याचे कार्य करीत आहे.
        यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे अठरापगड जातीतील अनेक मावळे उपस्थित होते.