शिवप्रहार न्यूज- बेलापूरच्या ९२ वर्षांच्या कंजीशेठांची करोनावर दणक्यात मात

शिवप्रहार न्यूज- बेलापूरच्या ९२ वर्षांच्या कंजीशेठांची करोनावर दणक्यात मात

बेलापूरच्या ९२ वर्षांच्या कंजीशेठांची करोनावर दणक्यात मात.

बेलापूर-बेलापूर येथील जुने व्यापारी कंजीशेठ यांनी सुमारे २० दिवसांपूर्वी  डॉ.आशिष सोमाणी यांनी नगर साईदिप रुगणालयामधे दाखल केले.तेथील डॉ रविंद्र सोमाणी यांनी त्यांच्यासोबतच बेलापूर येथील एकाच गल्लीत रहाणारे सतत कार्यमग्न असणारे वयोवृद्ध कंजीशेठ (९२) यांना रिस्क घेऊन दाखल करून घेतले. 
तिन दिवसानंतर त्यांना ॲाक्सीजन सुरू करण्यात आला. नंतर मात्र कंजीशेठ  यांनी मोठ्या मनोधैर्याच्या बळावर मी लौकरच यातून बाहेर पडणारच अशी खुणगाठ बांधली. 
            साईदिप मधे दाखल झाल्यानंतर डॉ .रविंद्र हे सल्लागार असल्याने त्यांनी खूप आधार दिल्याचे कंजीशेठ यांनी सांगितले. कोरोना काळात मदतीला धावुन आलेल्या सर्व नातेवाईक ,मित्र मंडळ व हितचिंतकांना कंजीशेठ यांनी धन्यवाद दिले. ते साक्षात श्री.शिव शंभो मंदीर जिर्नोध्दाराचे काम  इतर सहकार्यांबरोबर मंदीर करत असतांनाच कंजीशेठ यांना कोरोणाने गाठले होते. 
साईदिप रुग्णालय ,तेथील स्टाफ व डॉ रविंद्र सोमाणी यांचे कंजीशेठ यांनी विशेष आभार व्यक्त केले.