शिवप्रहार न्युज - शेतकरी संघटनेची दूध प्रश्नाबाबत आज महत्वाची बैठक…
शेतकरी संघटनेची दूध प्रश्नाबाबत आज महत्वाची बैठक…
श्रीरामपूर -२५ जुन रोजी शेतकरी संघटनेने दुधाला ४० रू हमीभाव,तसेच दुध भेसळी विरोधात कडक कायदे,पशुखाद्याचे वाढलेले दर,त्याचप्रमाणे उसाच्या धर्तीवर दुधाला MSP सारखा कायदा व्हावा ह्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने ३०रु दर व ५ रु अनुदान देत सकारात्मकता दाखवली होती.परंतु आजपर्यंत ५ महिने उलटत आले तरी बहुतांश शेतक-यांना अनुदान जमा झालेले नाही, पशुखाद्याचे दर ही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले व ३० रु चा तुटपुंजा दर हा आणखी २रुने कमी करुन २८रु दर तसेच आधीचे ५रु अनुदान जमा नसतांना नवीन ७ रु अनुदानाची घोषणा करत शेतकऱ्यांचा जखमेला मिठ चोळण्याचं काम हे सरकार एकमत करुन करत असल्याची भावना शेतकऱ्यांची झालेली आहे.
अडचणीत आलेला हा दुध व्यवसाय व खचत चाललेल्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रातील दुध आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड अजितदादा काळे यांचा नेतृत्वाखाली शनिवारी ठीक १०:३० वाजता,शेतकरी संघटना कार्यालय, श्रीरामपूर (कांदा मार्केट ऐडीसी बँकेच्या खाली शेळके डोळ्याचा दवाखाना रोड)येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.ह्यासाठी जिल्हाभरातील सर्व दुध उत्पादक प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकरी येणार असल्याचं दुध उत्पादक वींग शेतकरी संघटनेचे सागर गि-हे यांनी सांगीतले आहे.याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप,युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष शरद आसने,युवा उपाध्यक्ष संदीप उघडे ,डॉ दादासाहेब आदीक, डॉ विकास नवले,साहेबराव चोरमळ,ॲड प्रशांत कापसे,ॲड सर्जेराव घोडे,प्रकाश ताके, बाळासाहेब घोडे,सतीष नाईक,समीर रोकडे,अनिल भालदंड,बाबासाहेब आढाव, बापुसाहेब गोरे,विशाल शेळके,अरूण खर्डे,मयुर नाईक,सचिन वेताळ,गंगाधर वेताळ तसेच दुध उत्पादक शेतकरी उपस्थित राहणार आहे.
तरी मोठ्या प्रमाणात दुध उत्पादक शेतकयांनी उपस्थित रहावे असे आव्हान शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे