शिवप्रहार न्यूज -दै.जय बाबा चे संपादक ॲड.बाळासाहेब आगे यांचे श्रीरामपुरकरांना कळकळीचे आवाहन ...

सर्वांना कळकळीची विनंती आहे... डॉक्टर आरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुरात कोरोना रुग्णांसाठी अत्यंत अल्प दरात किंवा सर्वांनी मदत केली तर मोफत उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांची अनुमति सहकार्य आणि याबाबत सल्ला, सूचना, आवश्यक आहे. आपण सर्व जर "मी श्रीरामपूरकर" म्हणून त्यासाठी सकारात्मक भूमिका घेणार असतील तर आम्ही पुढाकार घ्यायला तयार आहोत .. वेळ फार वाईट आहे.. सर्वांनी गट-तट राजकारण बाजूला ठेवून आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला वार्ड, आपले शहर, सुरक्षित ठेवण्यासाठी.. आणि सर्वांना बेड मिळण्यासाठी, रेमडीसीवर इंजेक्शन साठी होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी हे करावे असे मला वाटते.. आपल्या जय बाबा परिवाराच्यावतीने कळकळीची विनंती करत आहे की, कृपया आपले मत सांगावे म्हणजे लवकर पुढे जाता येईल.
- ॲड. बाळासाहेब आगे
फेसबुक वरील पोस्ट पाहण्याकरिता:-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=505671027287605&id=100035341352588&sfnsn=wiwspwa