शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरचा तेजस गायकवाड पंढरपूर ते पंजाब २३०० किमी सायकल यात्रेत
श्रीरामपूरचा तेजस गायकवाड पंढरपूर ते पंजाब २३०० किमी सायकल यात्रेत
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५२ वी जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) येथून श्री क्षेत्र घुमान (पंजाब) येथे रवाना झालीआहे.
या यात्रेत श्रीरामपूर तालुक्यातील नामदेव शिंपी समाजाचे माजी विश्वस्त व खजिनदार कै.बाळासाहेब नानासाहेब गायकवाड व श्रीमती मिराबाई बाळासाहेब गायकवाड यांचे नातु व संतोष बाळासाहेब गायकवाड व सौ.शिल्पा संतोष गायकवाड यांचा मुलगा, युवक कार्यकर्ता तेजस संतोष गायकवाड (विश्वस्त नामदेव शिंपी समाज पंच मंडळ, श्रीरामपूर, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष), यांने सदर सायकल यात्रेत सहभाग घेतला असून २३०० कि.मी. अंतर पुर्ण करीत आहेत. सदर सायकल यात्रा ही संत नामदेव महाराज हे ७५० वर्षापूर्वी ज्या मार्गाने पायी गेले होते त्याच मार्गाने सदर सायकल वारी यशस्वी रित्या पार पडत आहे. सदर वारीमध्ये ११० जणांची टिम असून त्यात १० महिलांचा देखील समावेश आहे.
या यात्रेचे संयोजक व भागवत धर्म प्रसारक समितीचे संस्थापक प्रधान सूर्यकांत भिसे यांनी सांगितले की, ही राष्ट्रीय स्तरावरील पहिली सायकल व रथ यात्रा (अध्यात्मिक) आहे. या यात्रेच्या माध्यमातून भागवत धर्माच्या शांती, समानता प्रचार व प्रसार केला जाईल. संत नामदेव महाराज यांनी महाराष्ट्र बरोबरच उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या याच शांती, समता व बंधुताच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढली आहे.
या यात्रेचे संयोजक व भागवत धर्म प्रसारक समितीचे संस्थापक प्रधान सुर्यकांत भिसे यांनी सांगितले की, ही यात्रा महाराष्ट्रातून गुजराथ, राजस्थान, हरियाणा होऊन बुलढाण्याहून पंजाब राज्यात प्रवेश करून घुमन येथे संत नामदेव महाराज यांच्या समाधिधामात . ही यात्रा श्री क्षेत्र पंढरपूर हुन घुमन (पंजाब) पर्यंत २३०० कि.मी. ई. दि. ४ नोव्हेंबरला या यात्रेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री नामदेव महाराजांचे जन्मस्थान पंढरपूर येथून रवाना केली. होती. या यात्रेचा ४ डिसेंबर रोजी समारोप होणार आहे.