शिवप्रहार न्यूज- शिवप्रहार नायगाव “च्या वतीने हिंदू देवी-देवतांचे-महापुरुषांचे चित्र असलेले फटाके विक्री विरोधात निवेदन…

शिवप्रहार न्यूज-  शिवप्रहार नायगाव “च्या वतीने हिंदू देवी-देवतांचे-महापुरुषांचे चित्र असलेले फटाके विक्री विरोधात निवेदन…

“शिवप्रहार नायगाव “च्या वतीने हिंदू देवी-देवतांचे-महापुरुषांचे चित्र असलेले फटाके विक्री विरोधात निवेदन…

श्रीरामपूर- हिंदूंच्या महत्त्वपूर्ण सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाला नुकतीच सुरुवात झाली. या दिवाळी सणामध्ये हिंदू देवी देवता, महापुरुषांचे फोटो/चित्र असलेले फटाके दुकान/स्टॉल वर विक्री न होऊ देण्यासाठी नायगाव ता.श्रीरामपूर येथील शिवप्रहार प्रतिष्ठानच्या मावळ्यांच्या वतीने नायगाव ग्रामपंचायतीला आज शनिवार दि.२२/१०/२०२२ रोजी निवेदन देण्यात आले. 

      कोणत्याही स्टॉलवर अथवा दुकानांमध्ये हिंदू देवी -देवतांचे किंवा महापुरुषांचे चित्र असलेले फटाके विक्री करताना आढळल्यास विक्री करणाऱ्याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या कारणाने भादवि कलम 295 अ अंतर्गत त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.