शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या शिक्षकाचा खून करणारे, पेट्रोल पंप लुटणारे LCB ने पकडले

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरच्या शिक्षकाचा खून करणारे, पेट्रोल पंप लुटणारे LCB ने पकडले

श्रीरामपूरच्या शिक्षकाचा खून करणारे, पेट्रोल पंप लुटणारे LCB ने पकडले

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- केडगांव बायपास, नगर येथील हॉटेल के ९ समोर गोळीबार करुन श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेजमधील शिक्षकाच्या खुनासह जबरी चोरी करणारे तसेच साकुर, ता. संगमनेर येथील भगवान पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना चाकुचा व गावठी कट्टयाचा धाक दाखवुन रोख रक्कम बळजबरीने चोरणारे आणि घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर्सचे दुकानातील जबरी चोरी करणारी सराईत तीन आरोपींची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २३/०२/२०२३ रोजी फिर्यादी अरुण नाथा शिंदे, वय ४५, रा. नेप्ती, ता. नगर हे त्यांचे मित्रासोबत हॉटेल के ९ समोर, दारुपित बसलेले असतांना अनोळखी तीन इसम हातात चाकु व पिस्टल घेवुन आले व फिर्यादीचे गळ्याला चाकु लावुन तुमच्या जवळील पैसे काढुन द्या असे म्हणताच फिर्यादी व त्यांचा मित्र पळु लागताच एकाने हातातील पिस्टलने फिर्यादीचा मित्र श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालयातील शिक्षक शिवाजी किसन ऊर्फ देवा होले याचेवर गोळीबार करुन त्यांचा खुन केला व फिर्यादीचे डोळ्यात मिरचीपुड टाकुन त्यांचे जवळील रोख व मोबाईल फोन असा एकुण ६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. ९८६/ २०२३ भादविक ३९७, ३०२, ३४ सह आर्म ॲक्ट ३/२५ प्रमाणे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतांना दिनांक २६/०२/२०२३ रोजी घारगांव शिवारात रात्रीचे वेळी अनोळखी तीन इसमांनी पुणे ते नाशिक जाणारे रोड लगत असलेल्या लक्ष्मी टायर पंक्चर दुकानात प्रवेश करुन चाकुचा धाक दाखवुन दुकानातील इसमा जवळील व दुकाना समोरील ३४,५००/- रुपये किंमतीची मोटार सायकल, मोबाईल व रोख रक्कम बळजबरीने चोरुन नेली होती. तसेच पुढे जावुन त्याच तीन जणांचे टोळीने साकुर ते मांडवे जाणारे रोडवर, भगवान पेट्रोलपंप, साकुर, ता. संगमनेर येथे पंपावर काम करणारे कर्मचा-यांना चाकु व गावठी कट्टयाचा धाक दाखवुन पंपावरील २,५०,७४७/- रुपये रोख असा एकुण २,८५,२४७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. सदर दोन्ही घटने बाबत घारगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३ / २०२३ भादविक ३९२, ३९४ सह आर्म ॲक्ट ३ / २५ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील प्रमाणे घटना घडल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन मा.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, नगर यांनी घटना ठिकाणी भेट देवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई.सोपान गोरे, पोहेकॉ.मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, पोना.ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकुमार सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ.सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, लक्ष्मण खोकले, मपोना.भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ.उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व चापोना.भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकांची नेमणुक करुन तपासकामी तात्काळ रवाना केले.

  विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलीत करुन त्यावरुन गुन्ह्याचे तपासास सुरुवात केली. तसेच नगर शहर व नगर तालुका परिसर तसेच बायपास व इतर रोडवरील हॉटेल, लॉज, ढाबे व पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची माहिती घेत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केडगांव बायपास रोडवरील खुनाचा गुन्हा, साकुर ता.संगमनेर येथील भगवान पेट्रोलपंप जबरी चोरीचा गुन्हा व घारगाव शिवारातील लक्ष्मी टायर दुकानातील जबरी चोरीचा गुन्हा हा आरोपी अजय चव्हाण, रा. वळणपिंप्री, ता.राहुरी याने त्याचे साथीदारासह केला असुन तो त्याचे घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सदर माहिती पथकास कळवून खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पथक तात्काळ वळणपिंप्री, ता.राहुरी येथे जावुन संशयीताचे वास्तव्याबाबत माहिती घेवुन त्याचे राहते घरा जवळ सापळा लावुन थांबलेले असताना संशयीत आरोपी नामे अजय चव्हाण हा घरात असल्याची खात्री होताच पथकाने त्याचेवर झडप घालून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अजय भाऊसाहेब चव्हाण, वय २५, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. यांचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्याने त्यांचे इतर दोन साथीदारांसह केडगांव बायपास, नगर येथे गावठी कट्टयातून गोळीबार करुन गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच घारगांव शिवारातील लक्ष्मी टायर पंक्चर दुकान व भगवान पेट्रोल पंप साकुर, ता.संगमनेर येथे पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांना चाकू व गावठी कट्टयाचा धाक दाखवुन जबरी चोरी केल्याची कबुली दिल्याने पुढील तपास करुन त्याचे इतर दोन साथीदारांचा शोध घेवुन त्यांना त्यांचे राहते घरातून ताब्यात घेतले व त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे सागर वसंत जाधव वय २६, रा.वळणपिंप्री, ता.राहुरी व राजेंद्र भाऊसाहेब शिंदे वय २७, रा.खेडले परमानंद, ता.नेवासा अशी असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील गुन्ह्या बाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार नामे अजय भाऊसाहेब चव्हाण यांचे सोबत वरील गुन्हे केले असल्याची कबुली दिली. या तीनही आरोपींना पुढील कायदेशिर कारवाईकामी कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे. यापूर्वी आरोपी नामे अजय भाऊसाहेब चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द नगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे असे एकुण ११ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.

आहे. तसेच आरोपी सागर वसंत जाधव हाही सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द नगर जिल्ह्यात गंभीर दुखापत व दंगा करणे असे एकुण - ०२ गुन्हे दाखल आहेत.

    सदर कारवाई मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा.अनिल कातकाडे, विपोअ, नगर शहर विभाग, मा.संजय सातव, उविपोअ, शिर्डी विभाग अतिरिक्त प्रभार संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.