शिवप्रहार न्यूज- साप चावल्याने सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत...

शिवप्रहार न्यूज- साप चावल्याने सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत...

साप चावल्याने सात वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत...

श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव या गावात राहणार्या श्रुती संजय भापकर या सात वर्षीय लहान मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

      अधिक माहिती अशी की,श्रुती हिला राहत्या घराच्या परिसरात विषारी साप चावल्याने तिला औषध उपचार कामी लोणी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वी मयत असल्याचे घोषित केले.

       याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अपमृत्यू क्रमांक 43/2021 प्रमाणे नोंद घेण्यात आली आहे.घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक श्री.बोरसे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत.

       सात वर्षीय लहान मुलगी श्रुती हिचा साप सर्पदंशाने मृत्यू झाल्याने कारेगाव परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.