शिवप्रहार न्यूज- कल्याण मटक्यावरुन पानसरे ला बेलापुरात पकडले; जुगार ॲक्टखाली झाली कारवाई...

कल्याण मटक्यावरुन पानसरे ला बेलापुरात पकडले; जुगार ॲक्टखाली झाली कारवाई...
बेलापूर प्रतिनिधी -
बेलापूर बुद्रुक गावातील शिवनेरी गल्ली येथे विनापरवाना बेकायदा कल्याण मटका खेळताना तसेच खेळवीत असताना काल एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रकरणी अधिक माहिती अशी की,बेलापूर बुद्रुक मधील शिवनेरी गल्ली येथे घराच्या आडोशाला एक इसम बेकायदा कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची गुप्त खबर पोलिस कर्मचारींना मिळाली. सदर गुप्त खबरी ची माहिती पोलिस निरीक्षक सानप यांना देण्यात आली.त्यानंतर पो.नि. सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोको.पोपट भोईटे ,पोना.गणेश भिंगारदे ,पोको.निखिल तमनर यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता दिनेश अशोक पानसरे ,वय 38,राहणार -शिवनेरी गल्ली ,बेलापूर बुद्रुक तालुका-श्रीरामपूर हा विनापरवाना बेकायदा कल्याण मटका नावाचा जुगार खेळत खेळत असतांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही रक्कम व जुगाराची साधने मिळून आल्याने याप्रकरणी पो.को.पोपट दामोदर भोईटे यांनी फिर्याद दिल्यावरून दिनेश अशोक पानसरे याच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पो.ठाण्यात गु.र.नंबर 246 /2021 महाराष्ट्र जुगार ॲक्ट कलम ब 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिनेश पानसरे हा श्रीरामपूर-बेलापुरातील कोणत्या मटका किंग सोबत काम करतो याचा तपास पोलीस करत आहेत.