शिवप्रहार न्युज - छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…
छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…
श्रीरामपूर-त्रिलोकि हिंदु समाजाच्या वतीने श्रीरामपूर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक 2/06/2023 हिंदु साम्राज्य दिना निमित्त छत्रपती शिव राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात पार पडला.
सदर सोहळ्यात वैदिक यज्ञ विधीचे मोठे आयोजन करण्यात आले होते. ज्याने संपूर्ण वातावरण वैदिक मंत्राने शुद्ध झाले. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे ॲड. राजेश्वर भारस्कर, रामभरत यादव व डॉ. प्रशांत खैरनार यांनी केले होते. सदर कार्यक्रमास सर्व हिंदु संघटना उत्साहात उपस्थित राहून आपला मोलाचा सहभाग नोंदवला.यावेळी कार्यक्रमानंतर जय श्रीराम तालीम ग्रुपच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर सोहळ्याच्या आयोजनाने संपूर्ण वातावरण शिवमय झाले .संपूर्ण हिंदु समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण व वृध्दी करिता एकत्र येऊन हिंदु समाज व हिंदु साम्राज्य बळकट करावे असे आवाहन त्रिलोकि हिंदु समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.