शिवप्रहार न्यूज- बजरंगनगर मधील श्री.नागराज दत्त मंदिरात शनिवारी श्रीदत्त जयंती उत्सव…

बजरंगनगर मधील श्री.नागराज दत्त मंदिरात शनिवारी श्रीदत्त जयंती उत्सव…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं ७ मधील बेलापूर रोड,बजरंगनगर येथील श्री.दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर असलेल्या श्री.नागराज दत्त मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्रीदत्त जयंती उत्सव आज शनिवारी ( दि.१८) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
१६ वर्षांपूर्वी याठिकाणी श्रीदत्त मुर्तीवर गुरुवारी श्री.नागराज प्रगटले होते. या नागाने श्रीदत्त मुर्तीवर फणा काढून गुरुर् ब्रम्हा गुरुर् विष्णू गुरुर् देवो माहेश्वरा याप्रमाणे भगवान शंकराच्या बाजूने फणा उभारून सुमारे एक तास भाविकांना दर्शन दिले होते. तेव्हापासून दर श्रीदत्त जयंती उत्सवाला येथे महाप्रसाद केला जातो. आज शनिवारीही श्रीदत्त महाराज यांचा अभिषेक व महाआरतीनंतर वडा महाप्रसाद होणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलापूर रोड मित्र मंडळ,शिवप्रहार प्रतिष्ठान व बजरंगनगर भागातील नागरिकांनी केले आहे.