शिवप्रहार न्यूज- देवापेक्षा स्वतःला मोठे समजणार्यांचा झाला पराभव;बजरंग भक्तांच्या एकीमुळे “बजरंगनगर”झाले विजयीभव…
देवापेक्षा स्वतःला मोठे समजणार्यांचा झाला पराभव;बजरंग भक्तांच्या एकीमुळे “बजरंगनगर”झाले विजयीभव…
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागातील अशोक थेटर ते मुळा प्रवरा दरम्यानच्या भागाला “बजरंगनगर” नाव देण्याची भागातील बजरंगबलींच्या भक्तांची इच्छा नुकतीच पूर्ण झाली.
येथील दक्षिणुखी बजरंगबलींच्या भक्तांच्या मागणीनुसार श्रीरामपूर नगरपालिकेने नोव्हेंबर महिन्यात बजरंगनगर नामकरणाचा ठराव सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर करून घेतला.स्वतःच्या नावासाठी तडफडणाऱ्या काहींनी कायदेशीर त्रुटी यामध्ये काढल्या.परंतु नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकेच्या “कायदेशीर सल्लागारांकडून” बजरंगनगरला कायदेशीर मंजुरी मिळवून दिली.त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या भागाचे नामकरण व फलक आवरण मंजूर केले.
दिनांक 7 जानेवारी 2022 रोजी बजरंगनगर नामकरणाच्या तीन फलकाचे अनावरण लोकप्रिय नगराध्यक्षा अनुराधाताई अदिक यांच्या हस्ते झाले.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र गुलाटी,नगरसेवक राजेंद्र पवार, नगरसेवक राजेश अलघ, नगरसेवक रवी पाटील,नगरसेवक अल्तमास पटेल, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व बजरंगनगर भागातील नागरिक उपस्थित होते.
अशा प्रकारे कायदेशीररित्या व लोकशाही मार्गाने “बजरंगनगर नामकरण” झाल्यानंतर देखील काहींची देवाच्या नावाला विरोध करून स्वतःच्या नावासाठी चाललेली तडफड थांबत नाहीये. देवाच्या नावाला या भागातील कोणात्याही नागरिकाचा विरोध नाहीये कारण देवाच्या नावाला विरोध करण्याचे पाप आणि शाप भागातील लोकांना घ्यायचे नाहीत.पण स्वत:च्या नावासाठी तडफडणारे
काही लोक जनतेचा विरोध आहे अशा खोट्या अफवा पसरवीत आहे. हे काही लोकं काय बजरंगबलींपेक्षा स्वतःला मोठे समजता काय? या स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांना बजरंगबली सद्बुद्धी देवो.