शिवप्रहार न्युज - सरकारच्यावतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी दिल्याने “शिवप्रहार”चे मुंबईतील आंदोलन स्थगित...
सरकारच्यावतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी लेखी दिल्याने “शिवप्रहार”चे मुंबईतील आंदोलन स्थगित...
मुंबई/श्रीरामपूर -लव जिहादविरोधात कायदा व्हावा तसेच श्रीरामपूरला जिल्हा घोषित करावे,श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवस्मारकास परवानगी द्यावी,छ.संभाजीनगर व अहिल्यानगर नामकरणाची अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्यांसाठी दिनांक ०५ जुलै २०२३ पासून शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने आझाद मैदान,मुंबई येथे ऊन,वारा,वादळ,मुसळधार पाऊसात धरणे आंदोलन चालू आहे.
आज दि.२१ जुलै २०२३ रोजी या आंदोलनाच्या तब्बल १७ व्या दिवशी सरकारच्यावतीने सत्ताधारी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आणि शिवप्रहारच्या वरील मागण्यांच्या पुर्ततेसंदर्भात लेखी आश्वासन माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांना दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.म्हणुन लेखी आश्वासन मिळाल्यामुळे आझाद मैदान,मुंबई येथे “शिवप्रहार”च्या वतीने १७ दिवसापासुन चालू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.यावेळी पुणे येथील आमदार सुनिल कांबळे, भाजपा सांस्कृतिक सेलचे बंडुकुमार शिंदे, सिद्धार्थ गिरमे,शिवप्रहारचे मावळे ॲड.अक्षय आगे,ललित अस्वले,योगेश बोर्हाडे,रुषी सरोदे,अमोल सरोदे,महेश मंडलिक,गुरु आगे,सौमिक सोहनी,यश नागरे यांनी सहकार्य केले.
दरम्यान या आंदोलनाला अनेक संघटनांनी,शिवभक्तांनी व माता-भगिनींनी तसेच राजकीय नेतेमंडळींनी प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला होता. शिवप्रहारच्या वतीने या आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे, श्रीरामपूरकरांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे असे शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी सांगितले.