शिवप्रहार न्यूज- माळवाडगांव येथील खडका चौकाचे झाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण…

शिवप्रहार न्यूज- माळवाडगांव येथील खडका चौकाचे झाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण…

माळवाडगांव येथील खडका चौकाचे झाले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक नामकरण…

माळवाडगांव/प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील खडका चौक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौकाचे शिवजयंतीच्या मुहूर्तावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले.

         माळवाडगाव येथील खडका चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्याची मागणी येथील जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मागील अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे केली होती. या मागणीची दखल घेत माळवाडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने व जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने काल दि.२१ मार्च रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर खडका चौकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण माळवाडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब चिडे यांच्या हस्ते, शिवप्रहार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरज आगे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माळवाडगाव सोसायटीचे चेअरमन गिरीधर आसने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

          याप्रसंगी बोलतांना सरपंच चिडे म्हणाले की, शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करतो मात्र जयंती साजरी करत असताना जर अशा प्रकारे सामाजिक उपक्रम जो भावी पिढीला प्रेरणादायी असेल असे उपक्रम राबविल्यास खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल असे मत माळवाडगावचे सरपंच बाबासाहेब चिडे यांनी व्यक्त केले.

        यावेळी बोलतांना सुरज आगे म्हणाले की, येथील  ग्रामपंचायत व जगदंबा युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चौकाचे नामकरण करण्याचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.हा उपक्रम भावी पिढीला देखील नक्कीच प्रेरणादायी असेल,या उपक्रमामुळे संस्कृतीचे जतन होऊन छत्रपतींचा वारसा पुढे नेण्याचे काम केले. तसेच खडका चौकाचे नामकरण करून हा चौक व परिसर पवित्र झाल्याची प्रतिक्रिया यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरज आगे यांनी दिली.

         छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध लढण्यासाठी अठरा पगड जातींना एक करून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेंढ रोवली तर त्यांचे हिंदवी स्वराज्याचे कार्य पूर्ण करण्याचे काम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले यांच्या जयंतीनिमित्त या चौकाचे नामकरण करण्यात आले ही बाब गावाच्या दृष्टीने अभिमानास्पद असल्याचे उदगार चेअरमन गिरीधर आसने यांनी व्यक्त केले.

       यावेळी माळवाडगांव ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब काळे,गोरख आसने,बबन आसने,ग्रामविकास अधिकारी विजयकुमार मेहेत्रे,दिलीपराव हुरुळे,डॉ इलियासखान पठाण,तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष नानासाहेब आसने,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कचेश्वर जठार,सतीश आसने,कैलास आसने,छगन आसने,बाबासाहेब आसने,हरिभाऊ आसने,विजय हुरुळे,सुभाष आसने,नानासाहेब आसने,बबन आसने,बाळासाहेब रायभान आसने,सदाशिव आसने,देविदास हुरुळे,मधूआप्पा आसने,रामकृष्ण औटी,लहानुभाऊ हुरुळे,बबन हुरुळे,सुभाष थोरात,किशोर आसने,संजय आसने,रवींद्र उर्फ भगवान आसने,अमोल मोरे,अमोल दांगट,संजय होनमणे,बाळासाहेब ठकाजी आसने,गणेश आसने,तुळशीराम आसने,रावसाहेब आसने,राजेंद्र आसने,सोपान आसने,दादासाहेब आसने,दत्तात्रय काळे,जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव आसने,शिवप्रहार प्रतिष्ठानचे गणेश माळवे,सचिन वेताळ,राहुल मुळे, प्रसाद दहीवाळ,जगदंबा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक संदिप आसने,अध्यक्ष सतिष आसने,उपाध्यक्ष अतीश आसने,सचिव उद्धव आसने,विठ्ठल आसने,खजिनदार प्रदीप आसने,कार्यकारिणी सदस्य सचिन आसने,प्रमोद आसने,तन्मय आसने,अरबाज पठाण,गौरव आसने,शोएब पठाण यासह आदी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे नानासाहेब आसने यांनी आभार मानले.