शिवप्रहार न्यूज- शिर्डीतील 'साईराम' धंदा तुकाराम मुंढे बंद करतील?
शिर्डीतील 'साईराम' धंदा तुकाराम मुंढे बंद करतील?
शिर्डी (शिवप्रहार न्युज)- मुख्यमंत्री एकनाथ शिंन्दे शिर्डीत अचानक बाबांच्या दर्शनासाठी येवून गेले. आणि शिस्तप्रिय म्हणण्यापेक्षा नियम, काम प्रिय असलेले व सतत बदली होणारे तुकाराम मुंढे यांची शिंदे सरकारणे श्रीसाईबाबा संस्थान शिर्डीच्या कार्यकारी अधिकारी पदी नेमनुक केली. अचानक भाग्यश्री बानायात यांची बदाली झाली. शिर्डीत संस्थान मधील काही 'साईराम' करणारे व स्थानिक काही 'साईराम' करणारे दर्शनाच्या नावाखाली मोठा धंदा करतात. तेथे सर्व साईराम वाले तेरीभी चुप मेरीभी चुप! अशी भुमिका घेतात. दर्शन पासचे अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी भक्त करतात. मात्र प्रत्यक्षात 'साईराम' मध्ये मोठी कमाई असल्याने दर्शन आरती, काच काढून दर्शन याचे अनेक किस्से आहेत. अनेक अधिकारी येवून गेले त्यांच्या वाटयाला वादग्रस्त प्रकार आले. आता तुकाराम मुंढे हा 'साईराम' चा विळखा तोडणार का? अशी जोरदार चर्चा शिर्डीत सुरु झाली असून बाबांच्या भक्तांना सुरळीत सहज वेळेत दर्शन मिळेल का? हे मुंढेंची कामकाजाची पद्धत दाखवून देईल. येथे येणारा अधिकारी प्रसिद्धी करवून घेतो मात्र मुंढे हे आधिच त्याच्या स्वभावाने प्रसिद्ध आहेत. आता बाबांच्या शिर्डीत त्यांचे काम पाहुया. दुसरीकडे नव्याने आलेले एसपी राकेश ओला यांनी शिर्डीतील गुन्हेगारी वर कठोर भुमीका घेतली आहे.