शिवप्रहार न्यूज-रात्रीचे धक्के भूकंपाचे नव्हते तो वेगळाच विषय होता…
रात्रीचे धक्के भूकंपाचे नव्हते तो वेगळाच विषय होता…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरासह तालुक्यात काल रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरांच्या खिडक्या ,दरवाजे व काही घरांचे छताचे पत्रे थरथर कापले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिक घर सोडून रस्त्यावर बाहेर येऊन नेमके काय झाले आहे ? याबाबत चर्चा करू लागले.
दरम्यान हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याची चर्चा वाऱ्यासारखी श्रीरामपूर शहरातील गल्ली बोळ्यासह तालुक्यातील विविध गावांमध्ये पसरली. परंतु हे भूकंपाचे धक्के नसून लष्करांकडून नगर परिसरातील के.के.रेंज,नगर येथे चालू असलेल्या युद्ध सरावामुळे हे सौम्य भूकंपाच्या सदृश कंपणे जाणवल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी नागरिकांनी काळजी करू नये असे देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले असून नाशिक येथील भूकंपमापन केंद्राशी देखील प्रशासनाने संपर्क साधला आहे.
श्रीरामपूरसह ,राहता ,राहुरी कोपरगाव तालुक्यातील काही भागात अशाच प्रकारचे भुकंप सदृश्य धक्के काल रात्री जाणवले.