शिवप्रहार न्यूज -“ 100 करोड प्रकरणी “ सीबीआयचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर छापा...
“ 100 करोड प्रकरणी “ सीबीआयचा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर छापा...
मुंबई -माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू करुन सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी 06 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने सीबीआय ने मुंबई ,पुणे,नागपूर येथील माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर व मालमत्तांवर छापा टाकला आहे.यात अनिल देशमुखांचा मुंबईतील तत्कालीन सरकारी बंगला ‘ज्ञानेश्वरी’ या ठिकाणी सुद्धा छापा पडला आहे .या प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्व भुमीवर गृहमंत्री दिलीप वळले हे वर्षा बंगल्यावर मुंख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला गेले आहे.