शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरचा गुगल बॉय शौर्य सस्करची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद…
श्रीरामपूरचा गुगल बॉय शौर्य सस्करची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद…
श्रीरामपूर- शहरातील कर्मवीर चौक येथील जय हिंद करिअर अकॅडमी चे संचालक सुयोग सस्कर यांचे पुतणे चिरंजीव शौर्य अण्णासाहेब सस्कर या सहा वर्षाच्या मुलाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2022 साठी नोंद झालेली आहे. शौर्य दोन वर्षाचा असल्यापासूनच जनरल नॉलेज ची संपूर्ण गोष्टी व्यवस्थित पणे लक्षात ठेवतो व जसे की भारतातील सर्व राज्यांच्या राजधान्या, भारता शेजारील देश, तसेच विज्ञानातील पिरॉडिक टेबल व विज्ञानातील शोध याची संपूर्णपणे अचूक माहिती सांगतो. सुरवातीला या गोष्टी शिकवण्यासाठी त्याची आई अमृता सस्कर तसेच आजोबा विठ्ठल सस्कर व घरातील इतर सदस्यांबरोबर आत्या,मामा यांचे योगदान मोलाचे ठरते.
आज अमृत जवान सन्मान या तहसील कार्यालयातील आजी-माजी सैनिकांच्या अभियानाच्या निमित्ताने शौर्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी त्याने काही क्षणात सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे मान्यवरांना अचंबित करणारी ठरली.
जमलेल्या सर्वच मान्यवरांनी शौर्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत शेवटी शौर्य ने ही आय ए एस होण्याचे सांगितले. शौर्य सध्या महाले पोतदार शाळेमध्ये सिनियर के जी मध्ये शिकत आहे. त्याच बरोबर जय हिंद मध्ये प्रशिक्षण घेतलेले माजी सैनिक मेजर सचिन सत्रे यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रसंगी आमदार लहू कानडे साहेब ,सचिन गुजर ,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे माननीय न्यायाधीश नांदगावकर साहेब ,दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर माननीय न्यायाधीश कासट साहेब ,श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम ,प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, नगरपालिकेचे सी ओ गणेश शिंदे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पी आय सानप ,तालुका पोलिस स्टेशनचे पीआय खाडे ,श्रीरामपूर पंचायत समितीचे बी डी ओ तलाठी राजेश घोरपडे सैनिक संघाचे मेजर सरदार, मेजर शन्खेश पांडव,विट्ठलराव सस्कर, मेजर उंडे , सुनिल गवळी,तांबे,भालेराव, तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक जय हिंद चे संचालक सुयोग सस्कर ,अजय बत्तीसे, बाळासाहेब वाणी, कृष्णा वाघ त्याचबरोबर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.