शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरचे आमदार आणि राहुरीचे पी.आय. यांच्यामध्ये खडाजंगी..

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरचे आमदार आणि राहुरीचे पी.आय. यांच्यामध्ये खडाजंगी..

श्रीरामपूरचे आमदार आणि राहुरीचे पी.आय. यांच्यामध्ये खडाजंगी...

देवळाली प्रवरा -देवळाली प्रवरा शहरातील नगरपालिकेच्या सभागृहात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.कानडे यांनी विविध विषयांवरील आढावा बैठक आयोजित केली होती.या बैठकीत सरकारी अधिकारी व राजकारणी नेते मंडळी उपस्थित होते.

       त्यावेळी आमदार श्री.कानडे यांनी राहुरी पोलीस ठाण्याचे पी.आय. दुधाळ यांना प्रोटोकोल पाळण्याचा सल्ला दिला.त्यावेळी संतप्त झालेल्या दुधाळ यांनी माझी पंचवीस वर्षे सेवा झाल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.त्यामुळे या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. 

         उपस्थितांचे या प्रकारामुळे मनोरंजन झाले. यावेळी आमदार श्री.कानडे यांनी नायब तहसीलदार यांच्यावर देखील ताशेरे ओढले.