शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर डेपोत काही एसटी कर्मचारी हजर झाल्याने सर्वसामान्यांचा लालडबा धावला…
श्रीरामपूर डेपोत काही एसटी कर्मचारी हजर झाल्याने सर्वसामान्यांचा लालडबा धावला…
श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील एसटी आगारामध्ये संपावर असलेल्यांपैकी काही कर्मचारी हजर झाल्याने श्रीरामपूर बस स्थानकातून काल सायंकाळपासून सर्वसामान्यांचा लाल डब्बा अर्थात लालपरी जनसामान्यांसाठी धावण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेले सर्वसामान्य प्रवाशांचे हाल कुठेतरी थांबतील अशी आशा पल्लवित झाली आहे.
श्रीरामपूर डेपोचे मॅनेजर श्रीयुत शिवदे यांनी सांगितले की,श्रीरामपूर आगारामध्ये 300 पेक्षा जास्त एसटी कर्मचारी असून त्यापैकी काही कर्मचारी काल बुधवारी हजर झाल्याने काल सायंकाळपासून काही मार्गावरील बसेस श्रीरामपूर आगारातुन सोडण्यात आल्या. संपावरून हजर झाले नाही तर बडतर्फी सारखी अतिशय कठोर कारवाई सरकारकडून करण्यात येणार असल्यामुळे हे कर्मचारी हजर झाल्याची माहिती समजत आहे.
तसेच एसटी कर्मचारी संघटनेच्या लोकांचे म्हणणे आहे की,न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पुढची भूमिका घ्यावी.