शिवप्रहार न्यूज - शिर्डीतील गोंदकरांना गुजराती भामट्यांनी ४०लाखाला फसविले !श्रीरामपूरात विनयभंग !
शिर्डीतील गोंदकरांना गुजराती भामट्यांनी ४०लाखाला फसविले !श्रीरामपूरात विनयभंग !
श्रीरामपूर / शिर्डी (शिवप्रहार न्यूज ) श्री साईबाबांचे शिर्डीत सचोटीने हॉटेल व्यवसाय करणारे विक्रम रावसाहेब गोंदकर ,राहणार -साई विवेकानंद नगर शिर्डी यांना गुजरातच्या तिघा भामट्या व्यापाऱ्यांनी कर्ज मिळवून देतो म्हणत जवळजवळ चाळीस लाख रुपयाला फसविले. या घटनेने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून विक्रम रावसाहेब गोंदकर यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी धर्मेश पटेल, वसंत शहा , चव्हाण, तिघे राहणार- बडोदा ,गुजरात राज्य या भामट्यांविरुद्ध कलम 406, 420 ,34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदकर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ७डिसेंबर ते१६ डिसेंबर 20 22 दरम्यान आरोपी पटेल ,शहा ,चव्हाण यांनी त्यांच्या हॉटेलची पाहणी करून विश्वास संपादन करून त्यांच्या एम के एंटरप्राइजेस बडोदा, गुजरात यांच्यामार्फत बडोदा बँक गुजरात यांच्याकडून ४० कोटी रुपये कर्ज मिळवून देतो असे सांगून कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गोंदकर यांच्याकडून गुजरातचे आरोपी धर्मेश पटेल ,वसंत शहा ,मीत्तुल चव्हाण यांनी विश्वास संपादन करत गोड गोड बोलून त्यांच्या आयडीबीआय बँक बडोदा अकाउंट मध्ये व आरटीजीएसद्वारे वेळोवेळी 39 लाख 55 हजार 56 रुपये घेऊन हे गुजरातचे भामटे गोंदकर यांना म्हणाले की तुम्ही जेवण करून या .तुम्हाला चेक देतो असे म्हणून गोंदकर हे विश्वासाने जेवण करण्यासाठी गेले असता आरोपी यांनी त्यांच्या एमके एंटरप्राईजेसला कुलूप लावून पळून गेले. व गोंदकर या व्यापाऱ्याची गुजरातच्या भामट्यांनी हातोहात चाळीस लाखाची फसवणूक केली .
या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली सपोनी पाटील गुजरातच्या भामट्या आरोपींचा कसून शोध घेत आहे .
दरम्यान श्रीरामपूर शहरात काल दुपारी दोन च्या सुमारास भाजी मार्केट जवळ रस्त्याने चाललेल्या 26 वर्षाच्या तरुणीला आरोपी अतुल लोहारे ,राहणार -गोंदवणी रोड यांने दुचाकीवरून घेऊन माझ्याबरोबर चल असे म्हणत तरुणीने आरोपी अतुल लोहारे बरोबर जाण्यास नकार दिल्याने त्याने तरुणीची ओढणी ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी अतुल लोहारे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल खेडकर हे फरार आरोपी अतुलचा कसून शोध घेत आहे.