शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरकरांच्या ह्रदयस्पर्शी सन्मानास प्राप्त ठरलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांताधिकारी अनिल पवार

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूरकरांच्या ह्रदयस्पर्शी सन्मानास प्राप्त ठरलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांताधिकारी अनिल पवार

श्रीरामपूरकरांच्या ह्रदयस्पर्शी सन्मानास प्राप्त ठरलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांताधिकारी अनिल पवार...

  

श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- संपूर्ण पृथ्वीवरती मानव जातीला हादरवून सोडणारा कोरोना संसर्ग हिंदुस्तान, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यासह श्रीरामपुरातही आला आणि धुमाकूळ घातला अशा वेळी प्रशासनाच्या नियोजनाला महत्त्व आले. त्यावेळी श्रीरामपूर शहरात तहसीलदार म्हणून प्रशांत पाटील तर प्रांताधिकारी म्हणून अनिल पवार हे कार्यरत होते त्यांनी ज्या पद्धतीने कोरोना काळात रुग्णांना लागणारी मदत, नागरिकांना गरजेच्या वस्तू उदाहरणार्थ मोफत धान्य यापासून सर्वच शासकीय पातळीवरच्या कोरोनाच्या योजना नियम व मास्क सक्ती यावर प्रभावी जबाबदारीने कामकाज केले.

डॉक्टरांना, रुग्णालयांना प्रशासकीय साथ दिली. त्या काळात या अधिकाऱ्यांनी श्रीरामपूरकरांच्या मनात सेवावृत्तीचे बीज पेरले कोणताही भेदभाव न करता सामान्य नागरिकाला कशी मदत उपलब्ध करून देता येईल त्यावर तहसीलदार पाटील प्रांताधिकारी पवार यांनी एकत्रित समन्वय साधत योग्य ती भूमिका घेतली. कोरोना काळातील अनेक आठवणी सांगता येतील. डॉक्टर व कोरोना रुग्णालयांना कशी प्रशासकीय मदत होईल त्यासाठी मानवतेची भुमिका घेतली. मात्र कोरोनानंतर शेत जमिनीचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, जमीन ताब्याचे प्रश्न, किचकट नोंदी, शेती महामंडळाच्या सुटलेल्या जमिनी, त्यांच्या मोजणी-ताबा यासाठी अतिशय प्रामाणिकपणे विश्वासपात्र असे काम पवार व पाटील यांनी केले. अधिकारी चांगले असले तर काम आडत नाही तर त्यातून मार्ग निघतो व काम मार्गी लागते असे काम महसुली यंत्रणेचे झाले.

अनेक किस्से सांगण्यासाठी आहेत वेळप्रसंगी ते लिहिले जातील आता प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांची बदली झाली गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या बदलीची बातमी समजताच त्यांच्यावर सर्व स्तरातील लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला, होत आहे. यातूनच तहसीलदार पाटील व प्रांताधिकारी पवार यांनी श्रीरामपूरकरांच्या हृदयस्पर्शी सन्मानास पात्र असल्याचे सिद्ध झाले कारण काम करू! नाव करू!! अशा प्रकारे या दोन्ही अधिकाऱ्यांनी अतिशय कर्तव्यदक्षपणे येणाऱ्या नागरिकांची कामे करताना कधीही चुकीची भूमिका घेतली नाही तर चूक करणाऱ्याला व एकाचे दोन सांगणाऱ्याला योग्य प्रकारे हाताळले त्यातून खऱ्याला खरा न्याय मिळाला व गरजवंतालाही प्रशासनाकडून न्याय मिळाला ! प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांना शिवप्रहार न्यूज पोर्टल कडून पुढील वाटचालीस या शब्दरूपी हृदयापासून हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !

  - ज्येष्ठ पत्रकार मनोज आगे