शिवप्रहार न्युज - बेलापूरला उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून एकाचा मृत्यू…
बेलापूरला उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून एकाचा मृत्यू…
बेलापूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील खंडोबा मंदिराजवळ आज शनिवार दि.१८ जाने.रोजी सायंकाळच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या जागा खाली सापडून मोटरसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.उसाने भरलेले ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने ह्या मोटरसायकल स्वाराचा जागेच मृत्यू झाला.
मृत पावलेल्या इसमाकडील मोटरसायकलचा क्रमांक एमएच 45 डब्ल्यू 4060 असा असल्याचे समजते. मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.दरम्यान नुकतेच अशोकनगर जवळ अशाच प्रकारे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरच्या जुगाडाखाली येऊन एकाच मृत्यू झाला होता.आरटीओ कार्यालयाच्या दूर्लक्षामुळे असे नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहे.