शिवप्रहार न्युज - श्रीराम तरुण मंडळ अध्यक्ष अशोक उपाध्ये हल्ला प्रकरणी ०४ आरोपी पकडले…
श्रीराम तरुण मंडळ अध्यक्ष अशोक उपाध्ये हल्ला प्रकरणी ०४ आरोपी पकडले…
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - शहरातील श्रीराम तरुण मंडळ अध्यक्ष,व्यापारी श्री.अशोक उपाध्ये हल्ला प्रकरणी चौघा आरोपींना पोलिसांनी काल रात्री पकडले आहे. त्यात मनोज संजय साबळे वय-२२, रा. वार्ड नं.१, श्रीरामपूर , प्रसाद मनोज भांड, वय-२५, रा.गिरमे चौक, वार्ड नं. ३, श्रीरामपूर, गणेश बाबासाहेब मुंढे, वय-२५, रा.गोपीनाथनगर, वार्ड नं.३, श्रीरामपूर, रवी गौतम निकाळजे, वय-१९, रा.भिमनगर, वार्ड नं. ६ या चौघांचा समावेश असल्याचे पोनि. नितीन देशमुख यांनी सांगितले. काल गुन्हा दाखल झाल्यानंतर डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नितीन देशमुख यांनी रात्रीच सीसीटीव्ही फुटेजवरून चौघा आरोपींना जेरबंद केले.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी सागर बेगच्या घटनेतील सहभागाबाबत सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल्सचे डिटेल्स् तपासणीचे काम सुरू असल्याचे समजते.