शिवप्रहार न्युज - डंपरच्या धडकेमुळे माजी आर्मी मेजर मृत्यूमुखी...

शिवप्रहार न्युज -  डंपरच्या धडकेमुळे माजी आर्मी मेजर मृत्यूमुखी...

डंपरच्या धडकेमुळे माजी आर्मी मेजर मृत्यूमुखी...

 राहुरी - राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी समोर संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त मिलिटरी मेजर गोकुळदास दातीर व त्यांचा मुलगा उत्कर्ष हे नगरकडे कामानिमित्त जात असताना एका डंपर ने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे त्याचवेळी दुहेरी ट्रेलरच्या खाली सापडून मेजर गोकुळदास जातीर हे जागीच ठार झाले.

        सुदैवाने मेजर गोकुळदास दातीर यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हा काल सोमवारी झालेल्या ह्या घटनेत बालंबाल बचावला आहे.तो किरकोळ जखमी झाला असला तरी त्याचे प्राण वाचले आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी तात्काळ येत प्रशासनाने पुढील कारवाई केली आहे. येथील रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे एका माजी सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.