शिवप्रहार न्युज - वार्ड नं.२ मध्ये हवेत गोळीबार ? एकाला भोकसले...
वार्ड नं.२ मध्ये हवेत गोळीबार ? एकाला भोकसले...
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) आज शुक्रवारी दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान श्रीरामपूर शहरातील वार्ड नं.२ मध्ये घासगल्ली भागात दोन टोळक्यात बेदम हाणामाऱ्या होवून एकाला धारधार शस्त्राने भोकसन्यात आले तर एकाने त्याच्या जवळील गावठी कट्यातुन हवेत गोळीबार केला. यात दोन्ही बाजूनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. घटनास्थळी पोनि.देशमुख हे पोलीस फोजफाटा घेवून दाखल होताच पळापळ झाली. दोन टोळक्यांतील मारामाऱ्यांमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
अधिक माहिती घेतली असता राहाता तालुक्यात इस्तेमा कार्यक्रमात वादावादी झाली होती. तीची मिटवा - मिटवी करायची होती त्यातून दोन्ही टोळके समोरा समोर आल्याने भांडणे मिटविण्या ऐवजी हाणामाऱ्या झाल्या. याप्रकरणी पोलीस तपास करत असून एक टोळके घासगल्ली, वार्ड नं.२ तर दुसरे अशोकनगर परिसरातील असल्याचे समजते. मिटविणारा व बोलावणारा कोण होता ? हे पोलीस शोधत आहेत. दरम्यान नक्की हवेत गोळीबार झाला का ? गोळीबार गावठी कट्ट्यातून झाला का छऱ्याच्या बंदूकीतून झाला याची चौकशी पोलीस करीत आहेत.