शिवप्रहार न्युज - 22 जानेवारीला पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार...

शिवप्रहार न्युज -  22 जानेवारीला पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार...

22 जानेवारीला पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार...

मुंबई/श्रीरामपूर - येत्या 22 जानेवारी रोजी गेल्या अनेक वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग असलेला पालिका निवडणुकांचा विषय मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.कारण नुकतेच झालेल्या शिर्डी येथील पक्षीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विषय सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते.

       त्यामुळे 22 जानेवारीला यासंदर्भातील याचिकांवर जी सुनावणी होणार आहे.ती शेवटची सुनावणी ठरण्याची अतिशय दाट शक्यता आहे. त्यानंतर लगेचच पालिका/पं.स.,ZP,निवडणुकांच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केल्या जातील.साधारण एप्रिल/मे मध्ये या निवडणुका होतील असा अंदाज आहे.