शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरातील 24 व्यावसायिकांची याचिका न्यायालयाने फेटाळली…

श्रीरामपुरातील 24 व्यावसायिकांची याचिका न्यायालयाने फेटाळली…
श्रीरामपूर- शहरातील सर्कल परिसरातील सुमारे 24 व्यावसायिकांनी अतिक्रमण हटविण्यात येऊ नये म्हणून येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केला होती. त्यांनी दाखल केलेला दावा न्यायालयाने फेटाळला असून लवकरच त्याठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिक्रमण विभागाचे श्री. शेळके यांनी सांगितले.
सध्या शहरात अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरु आहे. अनेक ठिकाणचे अतिक्रमणे काढण्यात आले असून आपले नुकसान होऊ नये म्हणून अनेक व्यावसायिक आपले अतिक्रमणे काढताना दिसत आहे. त्यातच शहरातील सर्कल परिसरातील सुमारे 24 व्यावसायिकांनी श्रीरामपूर दिवाणी न्यायालयात अतिक्रमण काढण्यात येऊ नये म्हणून दावा दाखल केला होता. त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळला. यामध्ये अजीज खान, राहुल पवार, चंद्रभागा चव्हाण, मतीन शेख, लक्ष्मण पवार, इम्तियाज खान, रफिक सय्यद, भागवत बोंबले, अब्दुल सय्यद, अजित सिंग, सलिम शेख, दीपक मलिक, राजू शेख, अल्ताफ जहागीरदार, अख्तर पठाण, युनूस पठाण, हनुमंत वैष्णव, सचिन आमले, संदीप काळे, नामदेव झरेकर, इम्रान शेख, तनवीर तांबोळी, तेजस वैष्णव, अमोल शिंदे या 24 व्यावसायिकांनी येथील कोर्टात याचिका दाखल केला होती. परंतू त्यांचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे.काही दिवसांतच या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण अधिकार्यांनी सांगितले.