शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात मोठा प्लॉट दिराने फसवून सुधा खटोड यांच्या नावावर केला!तिघांनी केली फसवणुक!! 

शिवप्रहार न्युज  -  श्रीरामपुरात मोठा प्लॉट दिराने फसवून सुधा खटोड यांच्या नावावर केला!तिघांनी केली फसवणुक!! 

श्रीरामपुरात मोठा प्लॉट दिराने फसवून सुधा खटोड यांच्या नावावर केला!तिघांनी केली फसवणुक!! 

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर शहरात मध्य भागात असलेला,कोटीत किंमत असलेला,फायनल प्लॉट नंबर १०३० हा आरोपी दिर सुरेश खटोड याने श्रीमती राजकमल शशीकांत खटोड यांची कोऱ्या कागदावर फसवणुक करून,सह्या घेवून त्या आधारे बनावट कागदपत्र सेन्ट्रल बिल्डींग सीटीएस १३१५ फायनल प्लॉट नंबर १०३० याचे बक्षीस पत्र अरविंद गिरमे याच्या नावे करून,कुलमुखत्यारपत्र करून ते पत्नी सुधा खटोड यांच्या नावे करून फसवणुक केली आहे. 

       या प्रकरणी काल राजकमल शशीकांत खटोड, रा.पुणे यांनी श्रीरामपूर शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी दिर सुरेश खटोड त्याची बायको सुधा खटोड व अरविंद गिरमे, सर्व राहणार -श्रीरामपूर यांच्या विरुद्ध कलम ४२०,४६५ ,४६८,४७१ ,३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही फसवणुक सन २०११ ते २०२१ दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालय येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . 

            या घटनेने श्रीरामपूरात प्लॉट खरेदी विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे . या प्रकरणी पोनि नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आव्हाड हे पुढील तपास करीत आहे .