शिवप्रहार न्युज - होटकर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात;गुन्हा दाखल…

होटकर तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात;गुन्हा दाखल…
नगर- याबाबत हकीकत अशी की,३४ वर्षीय तक्रारदार व त्यांच्या आईने मौजे वाकोडी येथील 94 चौ. मी. क्षेत्र बक्षीस पत्राद्वारे तक्रारदार यांनी त्यांचे भावास दिलेले असून त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर करणेकरीता तक्रारदार यांच्याकडे 2,000 रुपये लाचेची मागणी आरोपी तलाठी राहुल होटकर,वाकोडी सज्जा,ता.नगर याने केली.त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवि. अहिल्यानगर येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली.म्हणून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई श्रीमती छाया देवरे,
पोलीस निरीक्षक लाप्रवि अहिल्यानगर,सापळा पथक पोलीस अंमलदार सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, चापोहेकॉ दशरथ लाड यांनी पर्यवेक्षण अधिकारी श्री. अजित त्रिपुटे पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. अहिल्यानगर व मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
यांच्या मार्गदर्शनाखाली केली.