शिवप्रहार न्यूज- सावेडी व एमआयडीसी परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (शनिवारी २४/९/२०२२) पहाटेपर्यंत रात्रीत तीन हुक्का पार्लरवर धाडसत्र राबवून १६ आरोपींना अटक….
सावेडी व एमआयडीसी परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (शनिवारी २४/९/२०२२) पहाटेपर्यंत रात्रीत तीन हुक्का पार्लरवर धाडसत्र राबवून १६ आरोपींना अटक….
अहमदनगर-२४ सप्टेंबर-२०२२
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना, गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , तोफखानाव एम आय डी.सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ बाळगुन हुक्का पार्लर चालवत असुन आता गेल्यास लगेच मिळून येतील अशी गुप्त माहिती अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तत्काळ एक पथक तयार केले पथकाने (शनिवारी २४/९/२०२२) पहाटेपर्यंत रात्रीत तीन हुक्का पार्लरवर धाडसत्र राबवून १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे ,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोहेकॉ/४४० संदीप कचरू पवार ,
पोहेकॉ/४८६ बापूसाहेब रावसाहेब फोलाने, पोहेकॉ/ ५ ९९ सुनिल सितराम चव्हाण , पोहेका / ९ ८१ दिनेश सोपान मोरे, पोना/३७६ शंकर संपत चौधरी, पोना/१७७२ लक्ष्मण चिंधू खोकले ,पोना/ १४८७ सचिन दत्तात्रय आडबल पोना / १३७२ संतोष शंकर लोढे , पोना /१५१६ रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोना / १५५७ भिमराज किसन खर्से,पोकॉ/२४८२ योगेश अशोक सातपुते,पोकॉ/ २६०० रोहित मधुकर मिसाळ, पोकॉ/१६९९ शिवाजी अशोक ढाकणे पोकॉ/२४३१ रोहित अंबादास येमुल,यांच्या पथकाने पहिली कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा नबर ८२६/२०२२* इसम नामे राजु भागेश्वर रॉय हा सावेडी या सुवारीत शासनाने बंदी घातलेले तंबाखुजन्य पदार्थ स्वतःकडे बाळगुन हुक्का पार्लर चालवत असुन जावुन खात्री केली असता नमुद ठिकाणी हॉटेल पंचशिल मध्ये एका टेबलवर तीन इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पॉटने हुक्का पिताना दिसले व एक इसम हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला .ठिक २१/१५ वा छापा टाकुन सदर इसमांना लागीच बसण्यास सांगुन त्यांना त्यांची नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे राजु भागेश्वर रॉय , वय २३ , रा . हॉटेल पंचशिल , सावेडी नाक्या जवळ , सावेडी , अ.नगर २ ) आयुष भिम भटराय , वय २१. रा . दातरंगे मळा , अनगर , ३ ) साकिब आरीफ शेख , वय १ ९ , रा . मुकुंदनगर , अ.नगर , ४ ) आझम आझीम शेख , वय १ ९ , रा . मुकुंदनगर , अ.नगर असे असल्याचे सांगितले व क्र . १. राजु भागेश्वर रॉय याने सदर हॉटेल मध्ये हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्या बाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले . सदर ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळून आले खालील वापरलेला अंदाजे किंमत १६३०० /००
*दुसरी कारवाई तोफखाना पोस्ट गु.र.नं. ८२५/२०२२* , इसम नामे जसविन राकेश पहजा , हा विराम हॉटेल शेजारी , कुष्टधाम रोड , सावेडी , अ.नगर ता जि . अ.नगर येथे पत्र्याचे शेड मध्ये सार्वजनीक रित्या मानवी जिवीतस धोका निर्माण होईल असा शासनाने बंदी घातलेले तंबाखूजन्य पदार्थ स्वतःकडे बाळगुन हुक्का पार्लर चालवीत होता नमुद ठिकाणी वा हॉटेल विराज शेजारीच पत्र्याचे शेड मध्ये दोन टेबलवर काही इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पाँटने हुक्का पिताना दिसले व एक इसम हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला . ठिक १ ९ / ३० वा छापा टाकून सदर इसमांना त्यांची नाव पत्ते १ ) जसविन राकेश पहुजा , वय २४ , रा . गुलमोहर रोड , रिध्दी सिध्दी कॉलनी , सावेडी अ.नगर , २ ) ऋषीकेश सतीश हिंगे , वय २१ , रा . भुतकरवाडी , अ.नगर ता . जि . अ.नगर , ३ ) अक्षय नाना शिंदे , वय २२ , रा . सारसनगर , अ.नगर , ४ ) आकाश डॅनिअल पाटोळे , वय २२ , रा . डीवाला मळा , सोलापुर रोड , अ.नगर , ५ ) ऋषी मनिष छजलानी , वय २० , रा . पोलीस लाईन जवळ , भिंगार , ता . जि . अ.नगर , ६ ) हर्षल रणजीत बैराट वय २१ , रा नेहरू कॉलनी भिंगार , ता जि . अ.नगर , ७ ) नितीन राजु मोरे , वय ३३ , रा . वाणीनगर , पाईपलाईन रोड , अ.नगर , ८ ) सागर पन्ना काळे , वय ३२ , रा . धानोरे ता आष्टी , जि . बीड . ९ ) किरण कुमार काळे , वय २४ , रा . नालेगाव अ.नगर , १० ) भैरवनाथ बबन धिवर , वय ३ ९ , रा . सावेडी तलाठी ऑफिस जवळ , अ.नगर असे असल्याचे सांगितले व क्र . १. जसविन राकेश पहुजा याने सदर हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्या बाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले .
सदर ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळुन आले त्याचे वर्णन खालील
वापरलेला अंदाजे किंमत १ ९ ४५० /००
*स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिसरी कारवाई एम.आय.डी.सी. पो.स्टे . , अ.नगर एम आय डी प्सी पो.स्टे . 1 गुरुनं ७३६ / २०२२*
इसम नामे शिवाजी संतराम गांगर्डे , हे नगर मनमाड रोड , विळद घाट , अ.नगर येथे हॉटेल द किंग कॅफे मध्ये एका टेबलवर एक इसम टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारे पॉटने हुक्का पिताना दिसला व एक इसम हुक्याचे साहित्य पुरविताना दिसला .
ठिक २२/०० वा छापा टाकून सदर इसमांना त्यांची नावे १ ) शिवाजी संतराम गांगर्डे , वय ५६ , रा . दत्तनगर , शेडी बायपास चौक , एम आय डी सी . वडगाव गुप्ता ता . जि . अनगर २ ) दिनेश ज्ञानेश्वर मिसाळ , वय २५ , रा . रेणुकानगर , बोल्हेगाव फाटा , अ.नगर , असे असल्याचे सांगितले व क्र . १. शिवाजी संतराम गांगर्डे , याने सदर हॉटेल मध्ये हुक्का पार्लर मी स्वतः चालवत असल्याचे सांगितल्याने त्यास सदर हुक्का पार्लर चालविण्याचा परवाण्या बाबत विचारपुस करता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले . सदर ठिकाणी टेबलवर हुक्का पिण्यासाठी लागणारा काचेचा पॉट व हुक्यासाठी लागणारे फ्लेवर व हुक्याचे इतर साहीत्य मिळून आले खालील प्रमाणे वापरलेला अंदाजे किंमत १८४५० /
वरील 16 आरोपी विरुध्द सिगारेट व तंबाखु उत्पादने ( जाहीरातीस प्रतिबंध आणि व्यापारी व वाणीज्य व्यवहार , उत्पादन पुरवठा व वितरण याचे विनिमय ) अधिनियम २००३ चा सुधारीत अधिनियम २०१८ कलम ४ व २१ ( १ ) प्रमाणे फिर्याद दाखल करून आरोपींना अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे ,पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे ,पोहेकॉ/४४० संदीप कचरू पवार ,पोहेकॉ/४८६ बापूसाहेब रावसाहेब फोलाने,पोहेकॉ/५९९ सुनिल सितराम चव्हाण , पोहेका/९ ८१ दिनेश सोपान मोरे,पोना/३७६ शंकर संपत चौधरी,पोना/१७७२ लक्ष्मण चिंधू खोकले ,पोना/१४८७ सचिन दत्तात्रय आडबल,पोना/१३७२ संतोष शंकर लोढे ,पोना /१५१६ रविकिरण बाबुराव सोनटक्के, पोना/१५५७ भिमराज किसन खर्से,पोकॉ/२४८२ योगेश अशोक सातपुते,पोकॉ/२६०० रोहित मधुकर मिसाळ,पोकॉ/१६९९ शिवाजी अशोक ढाकणे, पोकॉ/२४३१ रोहित अंबादास येमुल यांच्या पथकाने कारवाई केली आहे.