शिवप्रहार न्युज - घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या 40 गोवंशीय जनावरांची सुटका....

शिवप्रहार न्युज -  घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या 40 गोवंशीय जनावरांची सुटका....

घोडेगाव येथे कत्तलीसाठी डांबुन ठेवलेल्या 40 गोवंशीय जनावरांची सुटका....

नेवासा-याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. 

  नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले, अशोक लिपणे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, जालींदर माने, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले. 

  दिनांक 26/04/2025 रोजी पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संकेत साळवे व रवि आल्हाट, रा.घोडेगाव, ता.नेवासा यांचे घरासमोर इर्शाद कुरेशी, शन्या कुरेशी, बाबु पठाण, रा.चांदा, ता.नेवासा व रवि आल्हाट अशांनी मिळून गोवंशीय जनावरे कत्तल करण्याकरीता निर्दयतेने विना चारा पाण्याचे डांबुन ठेवले आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष झापवाडी रोड, घोडेगाव, ता.नेवासा येथे जाऊन खात्री केली असता संकेत साळवे व रवि आल्हाट यांचे राहते घरासमोर मोकळया जागेमध्ये गोवंशीय जातीचे जनावरे निर्दयतेने डांबुन ठेवल्याचे दिसल्याने तेथील इसमांना ताब्यात घेत असताना एक इसम पळून गेला. 

       घटनाठिकाणावरून 1) संकेत उर्फ सनी सुरेश साळवे, वय 27, रा.झापवाडी रोड, घोडेगाव, ता.नेवासा यास ताब्यात घेतले.त्याचेकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव 2) रवी आल्हाट, रा.झापवाडी रोड, घोडेगाव, ता.नेवासा पुर्ण नाव माहित नाही (फरार) असे सांगीतले.ताब्यातील आरोपीकडे जनावरांचे मालकीबाबत विचारपूस करता त्याने सदरची जनावरे ही 3) इर्शाद कुरेशी, पुर्ण नाव माहित नाही (फरार) 4) शन्या कुरेशी, पुर्ण नाव माहित नाही (फरार) 5) बाबु पठाण, पुर्ण नाव माहित नाही (फरार) अ.क्र.3 ते 5 रा.चांदा, ता.नेवासा व रवी आल्हाट यांचे मालकीची असल्याचे सांगुन सदरची जनावरे ही कत्तल करण्याकरीता डांबुन ठेवलेले असल्याची माहिती सांगीतली.पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणावरून 16,00,000/- रू किं.त्यात 40 गोवंशीय जातीची लहान मोठे जनावरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीस जप्त मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.

       वर नमूद आरोपीविरूध्द पोकॉ/2649 जालींदर मुरलीधर माने, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस स्टेशन गुरनं 156/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     .सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर, मा.श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.