शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात उद्यापासून वाहन तपासणी मोहिम...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात उद्यापासून वाहन तपासणी मोहिम...

श्रीरामपुरात उद्यापासून वाहन तपासणी मोहिम...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुर शहरात व परिसरात बिना नंबर प्लेट तसेच फैन्सी नंबर प्लेट लावुन फिरणारी दुचाकी व चार चाकी वाहने तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म लावून फिरतांना आढळून येत आहेत.त्यामुळे उद्या मंगळवार दि. २२ एप्रिल पासून अशा वाहनांची काटेकोरपणे तपासणी करुन अशी वाहने आढळून आल्यास ती ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्याकरीता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे वाहन तपासणीची धडक मोहिम राबवणार आहे.

      तरी सर्व श्रीरामपुर शहर व परिसरातील वाहन धारकांनी आपली वाहने शासनाने विहीत केलेल्या नियमांनुसारच वापरावीत,विना नंवर प्लेट तसेच फेन्सी नंबर प्लेट तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळ्या रंगाच्या फिल्म लावून फिरतांना आढळून आल्यास ते वाहन ताब्यात घेऊन चालक व मालक यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई कली जाईल असे पोनि.नितीन देशमुख यांनी सांगितले.