शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर RTO तर्फे अपघातग्रस्तांना मदत...

श्रीरामपूर RTO तर्फे अपघातग्रस्तांना मदत...
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज)श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी(RTO)अनंता जोशी आपल्या शासकीय वाहनाने सोनई ते घोडेगाव राज्य महामार्ग क्रमांक 66 प्रवास करताना त्यांना एक दुचाकी स्वार गंभीरित्याजखमी अवस्थेत रस्त्यावर आढळून आला.या दुचाकी स्वरास डोक्याला गंभीर इजा झाल्याकारणाने प्रचंड रक्त स्त्राव होत असल्याचे दिसून आले असता त्यांनी त्वरित आपली गाडी थांबवून उपस्थित नागरिक व वाहन चालक श्री.सावता कातकडे यांच्या मदतीने अपघातग्रस्तास आपल्या शासकीय वाहनात बसवून जवळील श्री.शनेश्वर ग्रामीण रुग्णालय शनिशिंगणापूर उपचारासाठी येथे दाखल केले. त्यामुळे अपघातग्रस्तास तातडीने मदत मिळून अपघातग्रस्तांचे प्राण वाचल्यास बहुमूल्य मदत झाली.
यावेळी उपादेशिक परिवहन कार्यालय,श्रीरामपूर यांच्यातर्फे सर्व नागरिकांना अपघातग्रस्तास तातडीने मदत करण्याचे आव्हान देखील करण्यात आले.तसेच अपघातग्रस्त दुचाकीस्वाराने जर हेल्मेट परिधान केले असते तर त्यास अजिबात गंभीर जखम झाली नसती म्हणून आरटीओ तर्फे सर्व नागरिकांस दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.