शिवप्रहार न्युज - पाटाच्या पाण्यावरून विनयभंग! विद्यार्थीनीस पळविले!! एकाने विष पिले!!! खळबळ...

शिवप्रहार न्युज -  पाटाच्या पाण्यावरून विनयभंग! विद्यार्थीनीस पळविले!! एकाने विष पिले!!! खळबळ...

पाटाच्या पाण्यावरून विनयभंग! विद्यार्थीनीस पळविले!! एकाने विष पिले!!! खळबळ...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यात पाटपाणी सुरू असून एक ६० वर्षाची शेतकरी महीला पाटाचे पाणी शेतात घेण्यासाठी गेली असता तिचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला व महिलेला काठीने मारहान करून धमाकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन ताराचंद कुमावात व किरण मोहन कुमात रा.घुमनदेव यांच्या विरुद्ध तालुका पोलीसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भापोसे रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. बर्डे हे आरोपींचा शोध घेत आहे.     

        दरम्यान सध्या तालुक्यात पाटपाणी सुरु असून अनेक भागात धनदांडगे डबल-डबल पाणी भरत आहे. तर ०२ एकराच्या नावाखाली १० - १० एकर भरणे केले जात आहे. वरिष्ठ पाटबंधारे अधिकाऱ्याला फोन केला तर त्यांचा संपर्क होत नाही कारण हाताखालचे हाताशी धरून पाटपाण्यातून पैसे उकळले जात आहे. याची पालकमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. आंधळं दळतं कुत्र पिठ खात अशी अवस्था सध्या पाटपाण्याची आहे. त्यातून वादीवाद होत आहेत. 

       दुसरी घटना अशी घडली की, श्रीरामपूर शहरातील वार्ड.नं १ मधील इंदिरानगर भागातून एका १७॥ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीला भरदिवसा अज्ञान आरोपीने पळवून नेले. आरोपीचा पोलीस शोध घेत आहे

     तसेच तालुक्यातील उक्कलगांव येथील विजय दादासाहेब झावरे,वय ४५ यांनी विष पिल्याने त्यांचा मृत्यु झाला. झावरे यांनी कोणते विष पिले ? कसे ? कधी ? का ? पिले याचा पुढील तपास पोनि.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ हापसे हे करीत आहे.