शिवप्रहार न्युज - माळवाडगावला फायनान्स कंपनी एजंटला शेखकडून लोखंडी पाईपने मारहाण…

शिवप्रहार न्युज -  माळवाडगावला फायनान्स कंपनी एजंटला शेखकडून लोखंडी पाईपने मारहाण…

माळवाडगावला फायनान्स कंपनी एजंटला शेखकडून लोखंडी पाईपने मारहाण…

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -कर्जाचा हप्ता मागायला आलेल्या फायनान्स कंपनी प्रतिनिधीला/एजंट ला लोखंडी पाईपने मारहाण करण्याचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे काल घडला आहे.

       याबाबत संतोष केरु माळी,वय ३४ हे ग्रामशक्ती फायनान्स कंपनीमध्ये कर्ज वितरण व वसुलीचे काम करतात आयशा शफीक शेख रा. माळवाडगाव यांना त्यांनी ७० हजार रुपये कर्ज दिले होते. परंतु कर्जाचे तीन हप्ते थकल्याने आयशा शेख यांच्याकडे संतोष माळी हे हप्त्याचे पैसे मागण्यासाठी गेले असता तेथे आयशा शेख यांचे पती व त्यांचा दिर यांनी तू आमच्या घरी पैसे मागण्यासाठी का आला ? असे म्हणते हातातील लोखंडी पाईपने संतोष माळी यांच्या डोक्यात,नाकावर मारुन त्यांना जखमी केले.

        दरम्यान संतोष माळी यांच्या फिर्यादीवरुन शफिक शेख,अजिज शेख यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलिस करीत आहेत.