शिवप्रहार न्युज - भाजप अध्यक्ष निवडीवरून लागलेल्या फ्लेक्सची श्रीरामपुरात जोरदार चर्चा...

भाजप अध्यक्ष निवडीवरून लागलेल्या फ्लेक्सची श्रीरामपुरात जोरदार चर्चा...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील विविध चौकामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नुकत्याच झालेल्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून लागलेल्या फ्लेक्स बोर्डची पूर्ण शहर व तालुक्याभर जोरदार चर्च चालू आहे.दरम्यान अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर भाजप शहराध्यक्षपदी जितेंद्र छाजेड व श्रीरामपूर भाजप तालुकाअध्यक्षपदी बाबासाहेब चिडे यांची नियुक्ती ०२ दिवसांपूर्वी करण्यात आली होती.त्यावेळी तेथे देखील मूळ भाजप कार्यकर्त्यांकडून या निवडीला आक्षेप घेण्यात आला होता.
दरम्यान अशी माहिती समजते की,भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी असे फ्लेक्स शहरात लावुन या निवडीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. हे पोस्टर नेमके कोणी लावले हे समजू शकले नाही.परंतू त्याची जोरदार चर्चा चालू आहे.त्या पोस्टरवरचा मजकूर खालील प्रमाणे आहे -
भाजपा अध्यक्षसाठी अटी शर्ती
१. फोर्च्यूनर गाडी आणि पैसे असेल तरच भाजप अध्यक्ष होता येईल.
२. दूध भेसळ घोटाळ्याचा गुन्हेगार पाहिजे.
३. बूथ प्रमुख व भाजप सदस्य न केलेला असला तरी चालेल.
४. DNA काँग्रेसचाच असला पाहिजे
५. अध्यक्ष निवडीसाठी मुलाखत न दिलेला असला तरी चालेल.
६. पैसे असेल तर ४५ वयाची अट शिथील केली जाईल.
७. तो भाजप सदस्य नसला तरी चालेल
॥ झन झन कि सुनो झणकार ए पैसा बोलता है ॥ एक श्रीरामपूरकर
वरील आशयाचे फ्लेक्स शहरासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असुन सोशल मीडियावर देखील हा फ्सेक्स व्हायरल होत आहे.तसेच या फ्लेक्स वर फॅार्च्युनर गाडी व दुधाच्या कॅनचा फोटो देखील आहे.