शिवप्रहार न्युज - राहात्यात वेश्या व्यवसायावर कारवाई; श्रीरामपूरच्या एजंटसह दोघे ताब्यात...

शिवप्रहार न्युज -  राहात्यात वेश्या व्यवसायावर कारवाई; श्रीरामपूरच्या एजंटसह दोघे ताब्यात...

राहात्यात वेश्या व्यवसायावर कारवाई; श्रीरामपूरच्या एजंटसह दोघे ताब्यात...

   राहाता (शिवप्रहार न्युज)- राहात्यात हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायावर कारवाई करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगर-मनमाड रोडवर राहता येथील हॉटेल उत्सव या ठिकाणी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला.

  यावेळी हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करवून घेणारे एजंट नानासाहेब जगन्नाथ शेळके रा.लाडगाव, श्रीरामपूर आणि हॉटेलचे मॅनेजर प्रसाद जगन्नाथ निर्मळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींच्या विरुद्ध राहता पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.