शिवप्रहार न्युज - महिलेने शिक्षीकेला फसवले! गुगलवर शोधले; बाईचे 26 लाख गेले!! रात्री मुलीला पळविले!!!
महिलेने शिक्षीकेला फसवले! गुगलवर शोधले; बाईचे 26 लाख गेले!! रात्री मुलीला पळविले!!!
नगर/संगमनेर (शिवप्रहान्यूज)-संगमनेर शहरात उर्फत नगर, फादरवाडी भागात राहणाऱ्या शेख शाहिस्ता मुजीब रेहमान या 35 वर्षे वयाच्या शिक्षिकेला तुला शिक्षक पदासाठी ऑर्डर काढून देते, असे म्हणत आरोपी महिला आमीना सलीम शेख रा-कुरण हल्ली रा-मालदाड रोड, संगमनेर हिने वेळोवेळी पैसे घेऊन 5 लाख 80 हजाराला फसविले. शेख या शिक्षिकेच्या फिर्यादी वरून आरोपी अमिता शेख या बाई विरुद्ध संगमनेर शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोनि.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई जाधव हे पुढील तपास करीत आहे.
दुसऱ्या घटनेत नगर शहरातील बोल्हेगाव भागात राहणारी विवाहित महिला शुभांगी गाडेकर वय-40 हिने गुगलवर वजन कमी करण्याचा उपाय शोधत असताना इंडिया फिटनेस कंपनी तिला दिसून आली. त्यावर समोरून नऊ मोबाईल नंबर वरून शुभांगी या महिलेचा विश्वास संपादन करून तिकडून बोलणारे आरोपींनी औषध देतो, उपाय करू असे सांगत वेळोवेळी आरटीजीएस, गुगल पे वरून 25 लाख 87 हजार 500 रुपये घेऊन ऑनलाईन फसवणूक केली. शुभांगी गाडेकर या महिलेच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांत नऊ मोबाईल नंबर वरील अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नील रणदिवे पुढील तपास करीत आहे.
तर तिसऱ्या घटनेत संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात चिंचपूर शिवारातून रात्री दीडच्या सुमारास एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला राहत्या घरातून अज्ञात आरोपींनी पळून नेले या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा आश्वी पोलिसांत दाखल झाला असून पोनि.भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अल्पवयीन विद्यार्थिनी व आरोपीचा कसून शोध घेत आहे. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली आहे.