शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर शहरात रस्ता गेला पाण्याखाली…

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर शहरात रस्ता गेला पाण्याखाली…

श्रीरामपूर शहरात रस्ता गेला पाण्याखाली…

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात बेलापूररोड भागातील बजरंगनगरला लागून असलेल्या पूर्णवादनगर परिसरामध्ये काल आणि आज झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्याखाली गेला आहे.

       पूर्णवादनगर भागातील शेती महामंडळाच्या क्रिकेट ग्राउंड जवळ म्हसोबा मंदिररोड हा पावसामुळे पाण्याखाली गेलेला आढळून आला.यामुळे या भागातील नागरिकांचे, लहान मुलांचे,जेष्ठांचे प्रचंड हाल होत आहे.निवडून आलेल्या नेत्यांनी पाणी साचण्याची ही समस्या न सोडवल्यामुळे संतापलेले नागरिक नेत्यांना शिव्या घालत आहे.