शिवप्रहार न्यूज- तरुणाचा अज्ञात कारणासाठी खून! भंगारवाल्याला लुटले!दिवसा मुलीस पळविले!

तरुणाचा अज्ञात कारणासाठी खून!
भंगारवाल्याला लुटले!
दिवसा मुलीस पळविले!
संगमनेर/श्रीरामपूर(शिवप्रहारन्यूज )- संगमनेर शहरात सुकेवाडी परिसरात संकेत सुरेश नवले वय 22 वर्ष या तरुणाच्या डोक्यात काहीतरी हत्याराने मारून त्याचा खून केला. नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेने संगमनेर शहर व तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी मयत संकेत नवले याचा नातेवाईक तेजस शिवाजी गुंजाळ रा-धांदरफळ बु. तालुका संगमनेर या तरुणाने संगमनेर शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर डीवायएसपी सातव पोनि भोसले यांनी भेट दिली. मयत संकेत नवले या तरुणाचा नेमका कोणी खून केला ? का केला ? याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेत श्रीरामपूर शहरात बोरावके कॉलेजच्या पाठीमागे काल रात्री 11:30 च्या सुमारास आदम युसुफ शाह वय-28 रा.वार्ड नंबर-2 या भंगार व्यवसायिकास चौघा जणांनी 'तू भंगारचे पैसे आणले का' असे म्हणत त्याच्या जवळील पैसे बळजबरीने काढून घेतले व शहा याला चौधा आरोपींनी लाथा बुक्क्यांनी व पाईपने मारहाण करूण जखमी केले. आदम युसुफ शाह यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेख, बागवान, शरीफ, असलम उर्फ गुल्लू या चौघांविरुद्ध भादवि कलम 394, 324, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून डीवायएसपी संदिप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींचा शहर पोलीस कसून शोध घेत आहे आरोपी श्रीरामपूर शहरातीलच आहेत.
तिसऱ्या घटनेत श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर-7 दळवी वस्ती कॅनॉल कडेला काल सकाळी सतरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमीष दाखवून अज्ञात आरोपीने फुस लावून पळून नेले. या घटनेने पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संबंधित मुलीचा व आरोपीचा कसून शोध घेत आहे. या मुलीसंबंधी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलीस सूत्रांनी केले आहे.