शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात दोघांना तलवारी सह पकडले!नगरला ३ कोटीची फसवणूक!!

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात दोघांना तलवारी सह पकडले!नगरला ३ कोटीची फसवणूक!!

श्रीरामपुरात दोघांना तलवारी सह पकडले! नगरला ३ कोटीची फसवणूक!!

श्रीरामपूर /नगर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरात पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली काल गोधवणी रोड परिसरात दोघा तरुणांना तलवार हातात घेऊन दहशत माजवताना पकडण्यात आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आत्तार यांच्या फिर्यादीवरून आरोपी इकबाल निसार शेख,वय-29, रा- वार्ड नंबर १, गोंधवणी रोड याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरी फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल कातखडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सद्दाम सत्तार शेख, वय-30, रा-वार्ड नंबर १ गोंदवणी रोड श्रीरामपूर याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांकडून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. 

दरम्यान आमचा नगरचा प्रतिनिधी कळवतो की, नगर शहरात एका व्यापाऱ्याची तीन कोटी दोन लाख एकुण साठ हजाराची फसवणूक झाली. गुंतवणूक करायला लावून ही फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला असून नगर शहरातील व्यापारी गणेश परसराम कदम रा-पुणे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्यादी दिल्यावरून आरोपी वैभव आनंद चेमटे रा-भाळवणी ता.पारनेर, किशोर शिवाजी पठारे रा-केडगाव, नगर, केदार सदाशिव आवटी रा-नाशिक, महेश पाटील व प्रशांत ढेपे दोघे रा-मोतीलाल ओस्वाल कंपनी, मुंबई यांच्याविरुद्ध भादवी कलम 406, 420, 34 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून गणेश कदम या व्यापाऱ्याने फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी संगणमत करून रेडीमिन्टन्स कन्सल्टन्सी कंपनीत गुंतवणूक कारालय लावून ब्रोकरेज न देता फसवणूक करून ३ कोटी 2 लाख 59 हजाराची फसवणूक केली. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोनि. संपतराव शिंन्दे यांच्या मार्गदर्शनाखवाली कोतवाली पोलीस करीत आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहे.