शिवप्रहार न्यूज- सरकारचे “आनंदाचा शिधा” दिवाळी फराळ वाटप श्रीरामपुरात सुरू…

शिवप्रहार न्यूज- सरकारचे “आनंदाचा शिधा” दिवाळी फराळ वाटप श्रीरामपुरात सुरू…

सरकारचे “आनंदाचा शिधा” दिवाळी किराणा वाटप श्रीरामपुरात सुरू…

 श्रीरामपूर - महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वसामान्य व गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी अवघ्या शंभर रुपयात साखर, तेल,रवा व चणाडाळ हा आनंदाचा दिवाळीचा शिधा श्रीरामपूर तालुक्यात पोहोच झाला आहे.

        आज पासून त्याचे वाटप प्रांत अधिकारी श्री अनिल पवार व तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.तसेच हा आनंदाचा शिधा वाटताना राशन दुकानदारांनी कुठलीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी व तक्रार येणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिला.

टीप-, बातमीच्या हेडिंग मध्ये नजरचुकीने दिवाळी किराणा ऐवजी दिवाळी फराळ असे टाईप झाले आहे तरी ते दिवाळी फराळ नसून दिवाळी किराणा असे आहे.