शिवप्रहार न्युज - महामंडलेश्वर श्री.श्री.१००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची "शिवप्रहार"च्या मुंबईतील आंदोलनाला भेट..
महामंडलेश्वर श्री.श्री.१००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची "शिवप्रहार"च्या मुंबईतील आंदोलनाला भेट...
मुंबई/श्रीरामपूर - दिनांक 05 जुलै 2023 पासून शिवप्रहार प्रतिष्ठानचे लव जिहादवर कायदा यावा,श्रीरामपूर जिल्हा व्हावा व इतर मागण्यांकरिता मुंबई येथील आजाद मैदानात धरणे आंदोलन चालू आहे.आज या आंदोलनाच्या ०७ व्या दिवशी महामंडलेश्वर श्री.श्री.१००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी भेट दिली आणि शिवप्रहारच्या या आंदोलनाला पूर्ण समर्थन असल्याचे माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांना सांगितले.
यावेळी शांतिगिरी महाराजांनी शिवप्रहार प्रतिष्ठानच्या सर्व मागण्यांना व त्यासाठी चालू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.या धरणे/ठिय्या आंदोलनात सरकारकडे लव्ह जिहाद कायदा व प्रभू श्रीरामांच्या नावाने वसलेले “श्रीरामपूर जिल्हा”घोषित करावे यासह छत्रपती संभाजीनगर नामकरणची थांबलेली अंमलबजावणी पुन्हा सुरू करावी,श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवस्मारकास शासनाने मंजुरी द्यावी तसेच देशभक्त IRS अधिकारी समीरजी वानखेडे यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा या इतर मागण्या करण्यात आलेल्या आहे.