शिवप्रहार न्यूज- पोलिसाच्या अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न !दोघांना अटक !दोघे पळाले !पोलिसांचा जीव धोक्यात घालून थरारक पाठलाग !!

शिवप्रहार न्यूज- पोलिसाच्या अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न !दोघांना अटक !दोघे पळाले !पोलिसांचा जीव धोक्यात घालून थरारक पाठलाग !!

पोलिसाच्या अंगावर गाडी घालून खुनाचा प्रयत्न !दोघांना अटक !दोघे पळाले !पोलिसांचा जीव धोक्यात घालून थरारक पाठलाग !!

संगमनेर ( शिव प्रहार न्यूज )-संगमनेर तालुक्यात नाशिक -पुणे महामार्गावर बोटा भागात माळवाडी येथे डिझेल चोरणारे चोरटे दोन स्विफ्ट गाड्यांमधून आले असल्याची माहिती घारगाव पोलिसांना मिळाली.पेट्रोलिंग वर असलेले पोलीस कर्मचारी किशोर सुधीर लाड व सहकारी घटनास्थळी पोहोचले तेथे पोलीस लाड यांनी एका आरोपीला हटकले व चौकशी केली.तेव्हा त्यांना धक्का मारून एक आरोपी त्याच्या गाडीकडे पळाला तर दुसरा आरोपी म्हणाला की ,पोलिसांना ठोका असे म्हटल्याने दोन गाडीतील चोरटे आरोपींनी अंधारात गाडी चालू करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.      

      तेव्हा पोलीस नाईक किशोर लाड यांच्या अंगावर आरोपींनी भरधाव गाडी घातली.तेव्हा ते बाजूला सरकले.मात्र गाडीचा धक्का लागून ते खाली पडून जखमी झाले . अशाही परिस्थिती त्यांनी कर्तव्य बजावत इतर पोलिसांच्या मदतीने आरोपींच्या गाडीचा पाठलाग करत चित्रपटातील थरार दृश्य प्रमाणे एक स्विफ्ट गाडी पकडली !त्यात दोनआरोपींना पकडण्यात आले.

      गाडीचा नंबर एम एच 14 एयू 51 99 असा असून ती स्विफ्ट डिझायर गाडी आहे.या गाडीत तीन प्लास्टिक ड्रम व त्यात चोरलेले डिझेल मिळून आले.या प्रकरणी जीव धोक्यात घालणारे व सुदैवाने बचावलेले पोलीस नाईक किशोर सुधीर लाड यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसात पकडलेला आरोपी उमेश तानाजी वायदंडे ,राहणार- गणेशनगर तालुका राहता व उत्तर प्रदेश कानपूर येथील सोहेल आली सय्यद ,सध्या राहणार-संभाजीनगर ,शिर्डी या दोघांविरुद्ध भादवि कलम ३०७ ,३५३, ४०१,३४ प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला . 

      पहाटे ४ च्या सुमारास ही थरारक घटना घडली.या घटनेने रात्रीच्या वेळी पोलिसांना ड्युटी करताना कसा जीव धोक्यावर ठेवावा लागतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे . डीवायएसपी सातव पोनि आव्हाड यांनी घटना स्थळी भेट दिली . पोनि पाटील हे पुढील तपास करीत आहे. एक सय्यद नावाचा आरोपी उत्तर प्रदेशचा असून तो शिर्डीत कधी पासून राहतो ?त्याचे नाव खरे आहे का ? त्याचे शिर्डीत येण्याचे व राहण्याचे कारण काय ? त्याचे साथीदार कोण ? याचा बारकाईने तपास होणे आवश्यक आहे पोलीस फरार दोघे व गाडीचा कसून शोध घेत आहेत .