शिवप्रहार न्यूज- लाचखोर ग्रामसेवक व पाणीपुरवठा कर्मचारी अडकले जाळ्यात...
लाचखोर ग्रामसेवक व पाणीपुरवठा कर्मचारी अडकले जाळ्यात...
राहुरी - राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक अभय सोनवणे व पाणीपुरवठा कर्मचारी नवनाथ धसाळ या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
एका त्रेचाळीस वर्षीय तक्रारदार पुरुषाच्या पहिल्या पत्नीची जमीन दुसऱ्या पत्नीच्या नावे करण्यासाठीची नोंद घेण्याबाबतच्या कामात वरील दोन्ही आरोपींनी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यामुळे वरील दोन्ही आरोपी यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 579/2021 प्रमाणे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.