शिवप्रहार न्यूज -नेतेमंडळींच्या पुढाकाराने बेलापुरात कोवीड सेंटर सुरु ...
नेतेमंडळींच्या पुढाकाराने बेलापुरात कोवीड सेंटर सुरु ...
बेलापूर(प्रतिनिधी-दिलीप दायमा )-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे जनता आघाडी, जनलक्ष्मी पतसंस्था, साई खेमानंद चॅरिटेबल ट्रस्ट व जनता आघाडीचे नेते रवींद खटोड यांच्या विशेष प्रयत्नाने बेलापूर येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. बेलापुर-श्रीरामपूर रोड येथील सांस्कृतिक मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरचे उद्घाटन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच भरत साळुंके यांनी कोविड सेंटर विषयी माहिती दिली साळुंके म्हणाले की, कोरोना हा रोग महाभयंकर असून ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही, अशा रुग्णांसाठी हे कोविड सेंटर दोन महिन्या करिता सुरू करण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक हे गाव मोठे असून या गावासाठी कोविड सेंटर सुरू करणे काळाची गरज होती. रुग्णांची सोय व्हावी म्हणून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. याकामी डॉ.चेतन लोखंडे, रत्नेश राठी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे साळुंके यावेळी म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमास भाजपाचे ओबीसी मोर्चा चे उपाध्यक्ष प्रकाश अण्णा चित्ते, ज्ञानेश्वर मुरकुटे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, कर्मयोगी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र खटोड, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा, अशोक थोरे, डॉ शैलेश पवार, पोलीस पाटील अशोक प्रधान, डॉ.सुधीर काळे, विजय ढोले, अभिजीत वासुदेव काळे, अनिल पवार, विराज भोसले, अशोक पवार, राशिनकर, पप्पू खरात, रमेश कुटे, किशोर राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी अल्ताफ मित्र मंडळाच्या वतीने कोविड सेंटरला बेडशीट, हॅन्ड ग्लोज, टिशू पेपर, प्लॅस्टिक बादल्या व लुक्कड यांनी 10 वाफेचे यंत्र तर महेश भांड यांनीही रुग्णांसाठी उपयोगी वस्तू दिल्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शनेश्वर यात्रा कमिटी, खटोड पतसंस्था व जनता आघाडीचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन अभिजीत रांका यांनी केले.