शिवप्रहार न्यूज - मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल-Dysp मिटके…
मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल-Dysp मिटके…
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र. नं.666/2022 भादवि कलम 363 (अ), 368, 370 (4), 370(अ), पोक्सो,3,4,5,(G),6,17 पिटा ॲक्ट 4,5,6,7, अ.जा.ज.अ. प्र.का.क 3(1),(w)(i),(ii),3(2),(v),(3)(2)(5a) प्रमाणे दाखल गुन्ह्यास मुल्ला कटर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
टोळीचा टोळीप्रमुख इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर वय 35 रा.वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर हा असून त्याचे श्रीरामपूर शहरात कायम वास्तव्य आहे तो आणि टोळीतील इतर सदस्यांनी वेळोवेळी एकत्र येऊन संघटितपणे मालमत्ताविषयक,शरीराविरुद्धचे,महिला अत्याचार संबंधी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे मुल्ला कटर हा कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नसून बळाचा वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याकरिता तो वेळोवेळी त्याचे टोळीतील साथीदारांसह श्रीरामपूर शहर परिसरात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतो त्यामुळे टोळीप्रमुख व टोळी सदस्या विषयी श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केलेले आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे राहणारी पिडीत हिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिला पांढरी पुल येथे टोळी सदस्य बाबा चेंडवाल यास विक्री केली टोळी सदस्य बाबा चेंडवाल याने तिचेवर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले व वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले तसेच टोळीप्रमुख मुल्ला कटर,बाबा चेंडवाल,पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेची शेवगाव येथे मिना मुसवत हिच्या कुंटणखाण्यात विक्री केली सदर गुन्ह्यात महिला आरोपी नामे सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्याचे तसेच वेश्याव्यवसाय करून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3(1),(ii),3(2),3(4)प्रमाणे मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करून त्या अनुषंगाने सखोल तपास करून अप्पर पोलीस महासंचालक सो (कायदा व सुव्यवस्था) यांचे मंजुरीनंतर विशेष मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.B.G. शेखर पाटील सो मा. श्री.राकेश ओला. पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके ,PI गवळी, API बोरसे, psi सुरवडे, Lpn अश्विनी पवार,PN संतोष दरेकर,Pc,रवींद्र माळी,विलास उकिरडे यांनी केली.